close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुलचं वनडे सिरीजमधून निलंबन

या दोंघावर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

Updated: Jan 11, 2019, 06:52 PM IST
हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुलचं वनडे सिरीजमधून निलंबन

मुंबई : कॉफी विथ करण या कार्यक्रमात भारतीय क्रिकटपटू हार्दिक पंड्या आणि लोकेश राहूल या दोघांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने या दोंघावर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बीसीसीआयचे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी पीटीआयला ही माहिती दिली. कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक पांड्याने त्याच्या सेक्स लाईफ बद्दल आक्षेपार्ह विधान केलं होते. यानंतर त्यांच्या निलंबनाची मागणी होऊ लागली. हार्दिक पांड्याने केलेल्या वक्तव्यामुळे त्याला बीसीसीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटीसला पांड्याने दिलेली कारणे समाधानकारक नसल्याचे विनोद राय यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या दोन्ही खेळांडूवर कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

नक्की काय बोलला पांड्या ?

करण जोहरच्या कार्यक्रमात आपल्या सेक्स लाईफवर भाष्य करताना तो म्हणाला की,  माझ्या सेक्स लाईफ बद्दल माझ्या कुटुंबाला काहीच विरोध नाही. कुटुंबासोबत जर पार्टीला गेलो असताना, घरच्यांनी मला प्रश्न विचारला की, तु कोणा मुलीसोबत सिन केला, त्यावर मी त्यांना सांगायचो की,  हिच्याबरोबर, हिच्याबरोबर आणि तिच्याबरोबर. असं सर्व असले तरी माझ्या घरच्यांना माझ्यावर अभिमान असल्याचं पांड्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात बोलला होता.

इतकं कमी म्हणून काय पांड्या म्हणाला की, मी जेव्हा पहिल्यांदा सेक्स करुन घरी परतलो तेव्हा, मी माझी व्हर्जीनिटी गमावली असल्याचंही घरच्यांना सांगितले होते. आज मी करुन आलोय असं त्याने कुटुंबाला सांगितल्याची कबुली कार्यक्रमादरम्यान दिली.या कार्यक्रमादरम्यान करण जोहरने पांड्याला, नाईट कल्बमध्ये गेल्यावर तु मुलींना त्यांची नाव का विचारत नाही ? असा प्रश्न केला होता. त्यावर उत्तर देताना पांड्या म्हणाला की, 'मुली नाचतात आणि त्यांचं निरीक्षण करायला मला आवडतं.'

पंड्याच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध होऊ लागला आहे. यामुळे हॉटस्टारने देखील हा वादग्रस्त व्हिडिओ आपल्या साईटवरुन काढून टाकला आहे.