Rishabh Pant, BCCI: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारचा भीषण (Car Accident) अपघात झाला. आगीने खाक झालेल्या गाडीमधून रिषभ थोडक्यात बचावला आहे. रिषभ पंतच्या भीषण अपघातानंतर आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पंतच्या शुक्रवारी काही (Rishabh Pant Health Update) वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी आता ऋषभला मुंबईतील रूग्णालयात (Mumbai Hospital) दाखल करण्यात आलंय. (will rishabh pant be paid his contract amount for missing ipl 2023 marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभच्या उजव्या पायाच्या गुडघ्याचा लिगामेंट (ligament) देखील टूटला होता. त्याच्या उजव्या हाताचे मनगट, टाच आणि अंगठ्यालाही दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीवरही खोल जखमेच्या खुणा आहेत. त्याच्या गंभीर दुखापत पाहता पुढील काही महिने तो मैदानात उतरू शकणार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता ऋषभ आयपीएल (IPL 2023) हंगाम खेळणार की नाही?, यावर अद्याप शंका आहे.


दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) ऋषभ पंतला 16 कोटी रुपये दिले आहेत, पण आता जर तो ही आयपीएल खेळू शकला नाही, तर त्याला ही रक्कम मिळेल का? असा सवाल उपस्थित होत आहे. पंत जरी आयपीएलच्या हंगामात खेळला नाही तरी त्याला पूर्ण पैसे मिळतील. फरक एवढाच आहे की, हा पैसा त्याला दिल्ली कॅपिटल्स देणार नाही तर बीसीसीआय (BCCI) देणार आहे.


आणखी वाचा - Rishabh Pant Accident: डुलकी लागल्याने नाही तर 'या' कारणामुळे झाला अपघात; स्वत: रिषभने केला खुलासा!


दरम्यान, 2011 साली लागू झालेल्या नियमांनुसार, बोर्ड बीसीसीआयच्या केंद्रीय करारात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना विमा (Insurance) देत असते. आयपीएलपूर्वी हे खेळाडू जखमी झाले किंवा अपघात झाला तर बीसीसीआय त्यांना संपूर्ण रक्कम देते. यापूर्वी दीपक चाहरला (Deepak Chahar) देखील 2022 मध्ये 14 कोटीचा विमा देण्यात आला होता.