Rohit Sharma: `या` कारणामुळे रोहित पुन्हा बनणार मुंबईचा कर्णधार? चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
Rohit Sharma: कदाचित पुन्हा एकदा चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे रोहित शर्माकडे पुन्हा एकदा कर्णधारपद येणार आहे.
Rohit Sharma: मार्चपासून जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलला मार्च महिन्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाचं लक्ष मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) टीमवर असणार आहे. याचं कारण म्हणजे नुकतंच मुंबईच्या टीमने रोहित शर्माला वगळून हार्दिक पंड्याच्या ( Hardik Pandya ) हाती कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. अशातच आता रोहित शर्माकडे पुन्हा एकदा कर्णधारपद येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
हार्दिक पंड्याकडे ( Hardik Pandya ) कर्णधारपद सोपवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) चाहत्यांमध्ये नाराजी दिसून आली. मात्र कदाचित पुन्हा एकदा चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे रोहित शर्माकडे पुन्हा एकदा कर्णधारपद येणार आहे.
रोहित शर्माला पुन्हा मिळणार कर्णधारपद?
गेल्या 3 सिझनपासून मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली नाही. यामुळे रोहित शर्माला यंदाच्या आयपीएलपूर्वीच कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. यावेळी त्याच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्यात आलं आहे. पण अशातच हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) दुखापतग्रस्त असल्यास रोहित शर्माच्या हाती पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हार्दिकला वर्ल्डकपदरम्यान झाली होती दुखापत
वर्ल्डकप 2023 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगलेल्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. यावेळी हार्दिकच्या अँकलला दुखात झाल्याने तो टीमच्या बाहेर गेला होता. हार्दिकच्या अँकलमधील 1 लिगामेंट फाटल्याने त्याला पुन्हा खेळण्यासाठी कमबॅक करायला वेळ लागण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे असा अंदाज लावण्यात येतोय की, हार्दिक आयपीएलच्या सुरुवातीचे काही सामने मिस करू शकतो.
हार्दिकने टीमसमोर ठेवली होती अट?
जेव्हा मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) ट्रेडसाठी हार्दिकशी बोलणी केली, तेव्हा हार्दिकने मुंबई इंडियन्ससमोर एक अट ठेवल्याचं समोर आलं होतं. मुंबई इंडियन्समध्ये ( Mumbai Indians ) येणार असेल तर कॅप्टन्सीची जबाबदारी पण द्यावी, असं हार्दिकने ( Hardik Pandya ) सांगितल्याचं एका रिपोर्टनुसार समोर आलं होतं. मुंबईने ( Mumbai Indians ) यासाठी वेळ घेतला अन् रोहितशी संपर्क साधला. दरम्यान यावेळी रोहितने हार्दिकच्या कॅप्टन्सीखाली खेळण्यास मंजुरी दिल्यानंतर हार्दिक नेतृत्व करणार असल्याची घोषणा करण्यात आली.