Virat Kohli: टी-20 WC मधून विराटची होणार हकालपट्टी? BCCI च्या पसंतीचा `हा` खेळाडू घेणार कोहलीची जागा?
Virat Kohli: आता टी-20 वर्ल्डकपच्या टीमसाठी विराट पहिली पसंती नसल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया.
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता टी-20 वर्ल्डकपच्या टीमसाठी विराट पहिली पसंती नसल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया.
पुढील वर्षात जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्डकप रंगणार आहे. नुकतंच बीसीसीआय, कोच राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्टर अजित आगरकर यांच्यात बैठक झाली. क्रिकेट बोर्डाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी योजना कशी असेल याची तयार करण्यास सुरुवात केलीये.
वर्ल्डकपपूर्वी किती सामने खेळणार टीम इंडिया
टी-20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला केवळ 6 टी-20 सामने खेळायचे आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे सिरीजमध्ये विराट, रोहित आणि बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत तिन्ही खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी आहे.
रोहित शर्मा सांभाळणार टीमची धुरा
दैनिक जागरणच्या एका अहवालानुसार, प्लेईंग 11 मध्ये पहिली पसंती ही रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह आहे. मात्र या टीममध्ये विराट कोहलीला पसंती नसून त्याचं स्थान निश्चित नाहीये. बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष आशिष शेलार आणि सिलेक्टर्स यांनी रोहित शर्माला टी-20 वर्ल्डकपमध्ये टीमचं नेतृत्व करण्यास सांगितलंय.
वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली. भारतीय कर्णधाराने 125 च्या स्ट्राइक रेटने 597 रन्स केले होते. विराट हा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, पण टी-20 वर्ल्डकपमध्ये तो बीसीसीआयची पसंती नाहीये.
विराटच्या जागी 3 क्रमांकावर कोण करणार फलंदाजी?
बैठकीला उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सिलेक्टर्सना सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करू शकणारा फलंदाज हवा आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकासाठी इशान किशनचं नाव आघाडीवर आहे. इशानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये 3 ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत चांगली खेळी केली आहे.
सिलेक्टर कोहलीशी करणार चर्चा?
सिलेक्टर्सच्या पसंतीनुसार, इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळायला उतरेल. यानंतर हार्दिक पंड्या, सूर्यकुमार कुमार यादव, केएल राहुल आणि रविंद्र जडेजा बाकी जागा भरतील. त्यामुळे विराट कोहलीला स्थान मिळत नाही. असंही म्हटलं जातंय की, या बाबतीत सिलेक्टर्स विराटशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे टी-20 वर्ल्डकपमधून विराटला डच्चू मिळणार का हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय.