विम्बल्डन : टेनिस चाहत्यांना ग्रास कोर्टवरच्या लढाईची ट्रीट मिळणार आहे. विम्बल्डनमध्ये दिग्गज टेनिसपटूंमध्ये विजेपदासाठी घमासान होणार आहे. आता विम्बल्डनच्या चमचमत्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे तमाम टेनिसप्रेमींचं लक्ष असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉजर फेडरर, राफाएल नदाल, अँडी मरे आणि नोव्हाक जोकोविच या टेनिसच्या दुनियेत टॉप फोर टेनिसपटूंमध्ये विम्बल्डनची ट्रॉफी जिंकण्यासाठी लढत रंगेल. सातवेळा विम्बल्डन जिंकणारा फेडरर विम्बल्डन संपल्यानंतर आणि अमेरिकन ओपन सुरु होण्यापूर्वी 36 वर्षांचा होईल. 36 व्या वर्षी 1972 केन रोसेवॉल यांनी ग्रँडस्लॅमला गवसणी घालण्याचा पराक्रम केला होता.


पाच वर्ष एकही ग्रँडस्लॅम न जिंकणा-या फेडररनं 2017 टेनिस सीझनच्या पहिल्याच ग्रँडस्लॅमवर अर्थातच ऑस्ट्रेलियन ओपनवर आपलं नाव कोरलं होतं. त्यामुळे विम्बल्डनवर त्यानं नाव कोरलं तर टेनिसप्रेमींना फेडररनं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद हे फ्लूक नव्हतं हे मान्य करतील. 


फेडररच्या मार्गात प्रमुख अडथळा असेल तो क्ले-कोर्टचा सम्राट राफेल नदालचा... नदालनं दुखापतींवर मात करत फ्रेंच ओपन जिंकली. त्यामुळे विम्बल्डनच्या रेसमध्ये नदालचं नावही आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे माजी विजेता ब्रिटनचा अँड मरेही आणखी एक ग्रँडस्लॅम जिंकण्यास आतूर आहे. त्याचप्रमाणे घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबाही त्याला मिळणार आहे. तर द जोकर अर्थातच नोव्हाक जोकोविचलाही कमी लेखून चालणार आहे. 


या चौघांमध्येच ग्रास कोर्टवर ख-याअर्थानं लढत रंगेल. तर वुमेन्स सिंगल्समध्ये विम्बल्डन ओपन टू ऑल अशीच असणार आहे. सेरेना विल्यम्स आणि ग्लॅमडॉल मारिया शारापोव्हा खेळत नसल्यानं विम्बल्डनमध्येही नवी चॅम्पियन मिळण्याची शक्यता आहे. फ्रेंच ओपन चॅम्पियन लॅटवियन येलेना ओस्टापेन्कोकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. आता ग्रास कोर्टच्या लढाईत कोण बाजी मारणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.