कोलकाता : टीम इंडियाला २०१८ मध्ये पहिली डे-नाईट टेस्ट खेळण्याची संधी चालू आली होती. मात्र टीम इंडियानं त्यावेळी नकार दिल्यानं टीम इंडियाची ही संधी हुकली होती. टीम इंडियानं आतापर्यंत एकदाही डे-नाईट टेस्ट खेळलेली नाही. विशेष म्हणजे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं केवळ तीन सेकंदांमध्ये कॅप्टन विराट कोहलीला डे-नाईट टेस्ट खेळण्यासाठी राजी केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डे-नाईट टेस्ट खेळण्यासाठी कोहली एँड कंपनी आतापर्यंत नाखूष होते. गेल्या चार वर्षात जगातील सर्व महत्त्वाच्या टेस्ट नेशन टीम्सनं डे-नाईट खेळण्याचा अनुभवही घेतला आणि आनंदही लुटला. मात्र टीम इंडियाच्या थोड्या आडमुठे भुमिकेमुळे ना टीम इंडिया डे-नाईट टेस्ट खेळली ना भारतीय फॅन्सना टेस्टच्या या नव्या अवताराचा आनंद लुटता आला. माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली आणि लागलीच त्यानं टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलाचं डे-नाईट टेस्ट खेळण्यासाठी मन वळवलं. खुद्द दादानंचं ही माहिती मीडियाला दिली.


ऍडलेडमध्ये ते का खेळले नाहीत माहित नाही. मी विराटची एक तास भेट घेतली. भेटीत मी त्याला पहिला प्रश्न डे-नाईट टेस्टबाबत विचारला. त्यानं तीन सेकंदांमध्ये आम्ही खेळण्यास तयार आहोत असं उत्तर दिलं, असं गांगुली म्हणाला.


सौरव गांगुली आता बीसीसीआय अध्यक्ष आहे. यामुळे दादाचा आदेश फेटाळून चालणार नाही हे विराटलाही पक्क ठाऊक आहे. त्यापेक्षाही गांगुली एक उत्तम माजी क्रिकेटपटू आणि माजी कॅप्टन असल्यानं विराटनं दादाचं म्हणणं मानलं. तोदेखील आता डे-नाईट टेस्टसाठी एक्साईट झालाय. 


डे-नाईट टेस्ट ही एक्साईटींग असेल. भारतीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक क्षणांची नोंद होणार आहे. भारतात पिंक बॉलनं खेळण्यासाठी आम्ही आनंदीत आहोत, अशी प्रतिक्रिया विराटने दिली आहे.


बांग्लादेश संघही प्रथमच डे-नाईट टेस्ट खेळत आहे. यामुळे बांग्ला टायगर्ससमोर टीम इंडियाचं तगड चॅलेंज असणार आहे. आम्हाला पुरेसा अनुभव नाही. आम्ही या टेस्टकडे अनुभव म्हणून पाहात आहोत आणि टेस्टचा आम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करु, असं वक्तव्य बांगलादेशचा कर्णधार मोमिन उल हकनं केलं आहे.