वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीप, अमित पंघलला रौप्य पदक
वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारतानं प्रथमच रौप्य पदक पटकावलं आहे.
नवी दिल्ली : वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारतानं प्रथमच रौप्य पदक पटकावले आहे. अमित पंघलनं भारताला हे ऐतिहासिक पदक पटकावून दिले. अमितनं ५२ किलो वजनी गटात उझबेकिस्तानचा ऑलिम्पिक पदक विजेता रेसलर शखोबिदिन झोईरोववर ५-०नं विजय साकारत पदकाला गवसणी घातली. तर भारताच्या मनिष कौशिकने ६३ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले.
वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचणारा देशातील पहिला पुरुष बॉक्सर ठरला आहे. महिला बॉक्सरमध्ये एमसी मेरीकॉम सहा वेळा विश्वविजेती बनली आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या क्वार्टर फायनलमध्ये अमितने कजाकिस्तानच्या साकेन बिबिसोनोवला पराभूत केले होते. फ्लाईटवेट कॅटेगरीतील हा सामना अमितने 3-2 असा जिंकला होता.