साऊथॅम्पटन : ५ जूनला टीम इंडिया वर्ल्ड कपची पहिली मॅच खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मॅचआधी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे. कर्णधार विराट कोहलीची दुखापत गंभीर नसल्याचं टीम व्यवस्थापनातल्या सूत्रांनी सांगतिलं आहे. शनिवारी सराव करत असताना विराटच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यानंतर विराट अंगठ्यावर आईस बॅग लावून मैदानातून बाहेर गेला, यामुळे भारतीय क्रिकेट रसिक चिंतेत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांनंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळायचा आहे. त्यासाठी कर्णधार विराट कोहली फिट होईल, असा विश्वास टीम व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. वर्ल्ड कप सुरु होण्याआधी झालेल्या सराव सामन्यात टीम इंडियाने एक सामना जिंकला होता, तर एक सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता, तर बांगलादेशविरुद्धची मॅच जिंकली होती.


आतापर्यंत १९८३ आणि २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाला यंदाही प्रबळ दावेदारापैकी एक मानलं जात आहे. पण दुखापती हे स्वप्न भंग करु शकतात. कोपराला झालेल्या दुखापतीमुळे विजय शंकर न्यूझीलंडविरुद्धचा सराव सामना खेळला नाही. तर केदार जाधवला आयपीएलदरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून केदार जाधव सावरत आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात केदार जाधव खेळू शकला नाही.