मॅनचेस्टर : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. मंगळवार ९ जुलैरोजी या दोन्ही टीम एकमेकांना भिडतील. पण या मॅचआधी टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याने एक ट्विट केलं आहे. 'थांबू शकत नाही... २४ तास राहिले,' असं हार्दिक पांड्या या ट्विटमध्ये म्हणाला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच न्यूझीलंडशी खेळणार आहे. टीम इंडिया सातव्यांदा वर्ल्ड कपची सेमी फायनल खेळत आहे, तर न्यूझीलंडचा हा आठवा सेमी फायनल मुकाबला असेल. याआधी ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला होता.


या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी चांगली झाली आहे. बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हार्दिकने ८ मॅचच्या ८ इनिंगमध्ये १९४ रन केले. यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४८ रन, वेस्ट इंडिजविरुद्ध ४६ रन, इंग्लंडविरुद्ध ४५ रन या खेळींचा समावेश आहे. या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक दोनवेळा नाबाद राहिला. ४८ रन हा हार्दिकचा वर्ल्ड कपमधला सर्वाधिक स्कोअर आहे. या वर्ल्ड कपमध्ये पांड्याने ९ विकेटही घेतल्या आहेत.