मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये भारताने मोठी धावसंख्या उभारली आहे. ही मॅच जिंकण्यासाठी पाकिस्तानला ३३७ रनचं आव्हान आहे. रोहित शर्माचं धमाकेदार शतक तसंच विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला एवढ्या स्कोअरपर्यंत पोहोचता आलं. ५० ओव्हरमध्ये भारताने ३३६/५ एवढा स्कोअर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माने ११३ बॉलमध्ये १४० रनची खेळी केली. तर केएल राहुलने ७८ बॉलमध्ये ५७ रन केले. कर्णधार विराट कोहलीने ६५ बॉलमध्ये ७७ रन केले. पण विराट कोहलीच्या विकेटवरुन गोंधळ पाहायला मिळाला. विराट कोहलीच्या बॅटला बॉल लागला नसला तरी तो माघारी परतला.


मोहम्मद आमीरने टाकलेल्या बाऊन्सरवर विराटने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बॉल विकेट कीपर सरफराजच्या हातात गेला. यानंतर मोहम्मद आमीर आणि सरफराजने अपील केलं. अंपायर मरे एरसमस यांनी विराटला आऊट दिलं नाही तरी विराट माघारी परतला.


विराट माघारी परतला असला तरी, अल्ट्रा एज बघितली असता विराटच्या बॅटला बॉलच लागला नव्हता, पण एक आवाज ऐकू आला. कॉमेंट्री करत असताना सौरव गांगुलीने नेमकं काय झालं असेल, याची शक्यता वर्तवली. विराटच्या बॅटचं हॅण्डल हलत असल्यामुळे तो आवाज झाला असल्याचं मत सौरव गांगुलीने व्यक्त केलं. विराट कोहलीनेही ड्रेसिंग रुममध्ये गेल्यावर बॅटच्या हॅण्डलकडे बघून इशारा केला. ड्रेसिंग रुममधून विराटच्या चेहऱ्यावरची निराशा दिसत होती.


पाहा नेमकं काय झालं?