मुंबई : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडने १८ रनने पराभव केला. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलं. वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न भंगल्यानंतर टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा मुंबईत परतला आहे. मुंबई विमानतळावर रोहित शर्मा त्याची पत्नी आणि मुलीसोबत दिसला. रोहित भारतात परतला असला तरी टीम इंडियाचे दुसरे खेळाडू रविवारी इंग्लंडहून भारतात परतणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३ जुलैला रोहित मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी रोहितसोबत त्याची पत्नी रितिका सजदेह, मुलगी समायरा आणि कुटुंबातले इतर सदस्य होते. रोहित स्वत: गाडी चालवून घरी परतला.



वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर टीम इंडिया मॅनचेस्टरमध्येच आहे. तिकीट मिळालया उशीर होत असल्यामुळे टीम इंडिया मॅनचेस्टरमध्येच अडकली आहे. खेळाडूंची भारतात परतण्याची तिकीट बूक करण्यात आली आहेत. रविवार १४ जुलैपर्यंत खेळाडू मॅनचेस्टरमध्येच असतील.


या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक ६४८ रनचं रेकॉर्ड केलं. एकाच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ५ शतकं करण्याचा विक्रमही रोहितने केला. याआधी हे रेकॉर्ड श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर होता. संगकाराने २०१५ वर्ल्ड कप ४ शतकं केली होती.


टीम इंडियामध्ये फूट? विराट-रोहितचा गट झाल्याचा खेळाडूचा दावा


रोहितचं भावनिक ट्विट


सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माने भावनिक ट्विट केलं. 'एक टीम म्हणून जेव्हा कामगिरी करायची गरज होती तेव्हा आम्ही अपयशी ठरलो. ३० मिनिटांचा खराब खेळ आणि आमची वर्ल्ड कप जिंकण्याची संधी हुकली. तुमच्या एवढ्याच माझ्याही भावना तीव्र आहेत. भारताबाहेर असतानाही मिळालेला तुमचा पाठिंबा अविस्मरणीय होता. जिकडे आम्ही खेळलो ती ठिकाणं निळी केल्याबद्दल धन्यवाद,' असं ट्विट रोहितने केलं.


वर्ल्ड कपनंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. ३ ऑगस्टपासून या दौऱ्याला सुरुवात होतील. वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडिया ३ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळेल. वनडे आणि टी-२० सीरिजसाठी विराट आणि बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. टेस्ट सीरिजसाठी मात्र हे दोन्ही खेळाडू पुनरागमन करतील.