World Cup 2019 : पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाची २ दिवस विश्रांती
टीम इंडिया ३ विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये ७ पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मॅंचेस्टर : टीम इंडियाने पाकिस्तानचा ८९ रनने पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयासोबत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धची विजयी मालिका कायम ठेवली आहे. या मॅचनंतर आता टीम इंडिया २ दिवस विश्रांती करणार आहे. टीम प्रशासनाने ही माहिती दिली आहे.
टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. तर न्यूझीलंड विरुद्धची मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे दोन्ही टीमना १-१ पॉइंट्स वाटून देण्यात आला. टीम इंडिया ३ विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये ७ पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टीम इंडियाने पाकिस्तानचा डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ रनने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धची विजयाची कामगिरी कायम ठेवली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा वर्ल्ड कपमध्ये ७ वेळा पराभव केला आहे.
विराट कोहली ११ हजारी
पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. वनडे कारकिर्दीत सर्वात वेगवान ११ हजारांचा टप्पा २२२ डावांत गाठण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. विराटने पाकिस्तानविरुद्ध ७७ रनची खेळी केली.
विजय शंकरचाही रेकॉर्ड
विजय शंकरने पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये आपल्या पहिल्याच बॉलवर विकेट घेण्याची कामगिरी केली. त्याने इमाम उल हकला आऊट केले. विशेष म्हणजे विजय शंकरचा हा वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना होता. त्याने आपल्या वर्ल्ड कपमधील पहिल्याच बॉलवर विकेट घेण्याचा रेकॉर्ड केलाला आहे. असा रेकॉर्ड करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. दरम्यान टीम इंडिया पुढील मॅच २२ जूनला अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे.