मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया पोहोचली आहे. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या मॅचमध्ये विजय झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल. म्हणजेच इतिहास घडवण्यापासून टीम इंडिया फक्त २ पावलं दूर आहे. पण यामध्येच आता टीम इंडियाच्या दोन सदस्यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे फिटनेस आणि कंडिशनिंग प्रशिक्षक शंकर बासू आणि फिजिओ पॅट्रीक फर्हाट हे वर्ल्ड कपनंतर आपल्या पदांचा राजीनामा देणार आहेत. यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आता बीसीसीआयला नव्या फिटनेस प्रशिक्षक आणि फिजिओचा शोध घ्यावा लागणार आहे. आता सोहम देसाई हे भारताचे आगामी फिटनेस प्रशिक्षक असतील.



पॅट्रीक फहार्ट


पॅट्रीक फहार्ट आणि शंकर बासू यांना बीसीसीआयने नवीन कराराची ऑफर दिली होती, पण या दोघांनी विश्रांती हवी असल्याचं सांगत नवा करार करायला नकार दिला.



शंकर बासू


शंकर बासू आणि पॅट्रीक फहार्ट यांच्यामुळे टीम इंडियाचा फिटनेस बऱ्याच प्रमाणात सुधारला. विराट कोहलीनेही आपला फिटनेस सुधारण्यात शंकर बासूंची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं होतं.


वर्ल्ड कपदरम्यान आयपीएलच्या वेळापत्रकावर निशाणा साधल्यामुळे शंकर बासू चर्चेत आले होते. शिखर धवनच्या दुखापतीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बासू म्हणाले, 'तुम्हाला आवडो अगर न आवडो पण आयपीएलच्या वेळांचा खेळाडूंच्या फिटनेसवर परिणाम होतो. आयपीएलदरम्यान खेळाडू २-३ वाजता झोपतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ट्रेनिंगला येणं हे खेळाडूंसाठी आव्हान असतं. खेळाडूंना झोपेची आणि उठायच्या वेळेचं, पोषक आहार आणि ट्रेनिंगचं महत्त्व कळतं.'