लंडन : वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने टॉसवेळी याबद्दलचं कारण सांगितलं. पाकिस्तानचे टेस्ट अंपायर रियाझुद्दीन यांचं या आठवड्यामध्ये निधन झालं, म्हणून पाकिस्तानी खेळाडू काळी पट्टी बांधून खेळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीच्या एलिट पॅनलचे अंपायर असलेल्या रियाझुद्दीन यांनी १२ टेस्ट मॅच आणि १२ वनडेमध्ये अंपायरची भूमिका बजावली होती.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने लेग स्पिनर एडम झम्पाच्याऐवजी फास्ट बॉलर केन रिचर्डसन आणि दुखापत झालेल्या मार्कस स्टॉयनिसऐवजी शॉन मार्शला संधी दिली आहे. तर पाकिस्ताननेही त्यांच्या टीममध्ये एक बदल केला आहे. लेग स्पिनर शादाब खानच्या ऐवजी फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीची टीममध्ये निवड करण्यात आली.