World Cup 2023 Prediction: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (WTC 2023 Final) लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचं लक्ष आता आगामी वर्ल्ड कपवर असणार आहे. यंदा यजमानपद भारताकडे असल्याने भारतीय मैदानावर खेळण्याचा फायदा टीम इंडियाला (Team India) मिळू शकेल. अशातच आता टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड या संघांकडून सावध राहण्याची गरज आहे, असं म्हटलं जातंय. मात्र, भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा (Akash Chopra) याने 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेश (Bangladesh) संघ टीम इंडियासाठी धोका ठरू शकतो, असं भाकीत केलं आहे. त्याचं कारण देखील त्याने स्पष्ट केलं आहे. 


नेमकं काय म्हणाला आकाश चोप्रा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्या मते, बांगलादेश 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये अतिशय धोकादायक संघ आहे आणि बांगलादेश संघ भारताला अडचणीत आणू शकतो. भारताचा विश्वचषकातील बांगलादेश विरुद्धचा (Ind vs Ban) सामना 19 ऑक्टोबर रोजी पुण्यात होणार आहे. हा एक संघ आहे जो प्रत्यक्षात काही नुकसान करू शकतो. त्यामुळे टीम इंडियाला मजबूत टक्कर द्यावी लागेल, असं आकाश चोप्रा याने मत मांडलं आहे. 


आगामी वनडे वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) संभाव्य वेळापत्रक समोर आलंय. संभाव्य वेळापत्रकानुसार, 19 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे नेहमी गेटवे ऑफ ठरणाऱ्या बांगलादेश संघाविरुद्ध टीम इंडिया कशी कामगिरी करणार? असा सवाल विचारला जात आहे. बांगलादेशच्या संघाने नेहमी वर्ल्ड कपमध्ये मोठ्या टीमला टार्गेट केलंय. 2007 चा वर्ल्ड कप सर्वांना आठवत असेल. जेव्हा बांगलादेशने नागिन डान्स करत टीम इंडियाला एलिमिनेट केलं होतं. सचिन, द्रविड, सेहवाग यांचे पडलेले चेहरे सर्वांच्या नजरेत असतील.


आणखी वाचा - सुरेश रैनाने अचानक CSK का सोडली? 'या' खेळाडूचं नाव घेत Mr. IPL म्हणतो...


दरम्यान, 2015 साली बांगलादेशने बलाढ्य इंग्लंडला वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. 2023 च्या वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांनीही पात्रता मिळवली आहे.


World Cup 2023  मधील भारताचं संभाव्य वेळापत्रक


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड 22 ऑक्टोबर धर्मशाळा
भारत विरुद्ध इंग्लंड, 29 ऑक्टोबर, लखनऊ
भारत विरुद्ध पात्रता संघ, 2 नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध पात्रता संघ, 11 नोव्हेंबर, बंगळुरू