World Cup 2023 England Vs Afg Virat Kohli Ben Stokes Poster: भारत हा क्रिकेट वेड्यांचा देश आहे असं म्हटलं जातं. याच क्रिकेट वेड्यांच्या देशात सध्या एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप खेळवला जात आहे. हळूहळू ही स्पर्धात रंगात येऊ लागली आहे त्याप्रमाणे मैदानातील प्रेक्षकांची संख्याही वाढताना दिसतेय. इंग्लंड आणि अफगाणिस्तानदरम्यान नवी दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यातही असेच काहीसे दृष्य दिसून आले. अफगाणिस्तानच्या संघाने इंग्लंडला 69 धावांचा पराभव करुन ऐतिहासिक कामगिरी केली. या सामन्यामध्ये प्रत्यक्ष मैदानातील खेळाबरोरच इतर अनेक गोष्टी चर्चेत राहिल्या. त्यापैकीच एक म्हणजे दिल्लीकरांना झालेली विराट कोहलीची आठवण पण ही आठवण अगदी डबल मिनिंग स्टाइलने झाली हे विशेष.


विराटमुळे बेन स्ट्रोक्स चर्चेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्ट्रोक्स हा अफगाणिस्तानच्या सामन्यामध्ये खेळला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये बेन स्ट्रोक्स डगआऊटमध्ये राखीव खेळाडू म्हणून उपस्थित होता. जखमी असल्याने त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळाली नाही. मात्र असं असलं तरी बेन स्ट्रोक्सची क्रेझ दिल्लीमधील क्रिकेट चाहत्यांमध्ये दिसून आली. बरं ही क्रेझ चक्क विराट कोहलीच्या माध्यमातून दिसून आली.


नक्की वाचा >> भारताच्या विजयानंतर इस्रायलने उडवली पाकची खिल्ली! म्हणाले, 'पाकिस्तानला हमासच्या दहशतवाद्यांना...'


नेमका संदर्भ काय?


विराट कोहलीने 'स्टार स्पोर्ट्स'ला काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूसंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर विराटने सर्वकालीन आवडता खेळाडू विचारला तर मी सचिन तेंडुलकरचं नाव घेईन असं सांगितलं. सचिनला पाहतच मी लहानाचा मोठा झालो आहे, असंही विराट म्हणाला. तर सध्याच्या सक्रीय खेळाडूंपैकी माझा आवडता खेळाडू हा बेन स्ट्रोक्स आहे, असंही विराटने मुलाखतीत सांगितलं. 


नक्की वाचा >> Ind Vs Pak मॅचनंतर विराट-अनुष्कामध्ये मैदानातच डमशराज! Video पाहून ओळखा बघू तो काय म्हणतोय


बॅनर्सवर शब्द काय?


विराट कोहीला बेन स्ट्रोक्स आवडतो हाच संदर्भ घेत काही चाहत्यांनी 'विराटला बेन स्ट्रोक्स आवडतो' असा मजकूर लिहिलेले बॅनर्स सामन्यादरम्यान दाखवले. तर अन्य काही चाहत्यांनी चक्क 'दिल्ली से हूँ बेन स्ट्रोक्स' असं बॅनर पकडल्याचं कॅमेरामध्ये कैद झालं. विराट मैदानामध्ये संतापल्यावर किंवा जोषात येऊन शिवीगाळही करतो असं अप्रत्यक्षपणे चाहत्यांना सुचवायचं आहे. बेन स्ट्रोक्सच्या नावाचा उच्चार एका अपशब्दाशी साधर्म्य साधाणार असल्याने विराटचे अनेक चाहते अफगाणिस्तानच्या सामन्यामध्ये बेन स्ट्रोक्सच्या नावाचा असा अनोख्या पद्धतीने वापर करत बॅनर्स झळकावत होते. मात्र सामन्यात खेळत नसलेला बेन स्ट्रोक्स अनेकदा जांभई देताना कॅमेरात कैद झाला. त्यामुळे हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.


1)



2)



'विराट... विराट'चा जयघोष


दरम्यान, याच सामन्यामध्ये नवीन-उल-हकने जोस बटलरला बोल्ड केल्यानंतर मैदानामध्ये 'विराट... विराट...'च्या घोषणा चाहत्यांनी दिल्या. नवीन-उल-हक आणि विराट कोहलीमध्ये आयपीएलदरम्यान वाद झाला होता. मात्र अफगाणिस्तानविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये झालेल्या भारताच्या दुसऱ्या सामन्यात या दोघांनी एकमेकांची गळाभेट घेत वादावर पडदा टाकला. मात्र चाहत्यांच्या डोक्यातून नवीन-उल-हक म्हणजे विराटचा जयघोष करण्याची संधी हे समीकरण काही जाता जात नाही.