Ind vs Pak Match Virat Kohli Anushka Sharma Viral Video: वर्ल्ड कपच्या सराव सामन्याआधीच विराट कोहली अचानक मुंबईमध्ये दाखल झाला. त्यानंतर विराट कोहली 2 दिवसांनी पुन्हा भारतीय संघाबरोबर दिसून आला. विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ही दुसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा सोशल मीडियापासून सगळीकडेच रंगली. अनुष्का गरोदर असल्याने वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी जाणार नसल्याचंही सांगण्यात आलं. मात्र अहमदाबादमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी अनुष्का शर्मा आवर्जून उपस्थित होती. व्हाइट कलरच्या गाऊनमध्ये अनुष्का फारच सुंदर दिसत होती. सामन्यादरम्यान अनेकदा अनुष्काची झलक कॅमेरात टीपली. दरम्यान सामन्यानंतरचीही एक खास गोष्ट कॅमेरात टीपली गेली असून यामधून विराट आणि अनुष्का कसे कपल गोल्स आहेत यासंदर्भातील चर्चा दोघांच्या चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.
अनुष्का शर्मा, रोहित शर्माची पत्नी ऋतिका सजदेहबरोबरच रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाही अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धचा सामना पाहण्यासाठी हजर होते. रोहित शर्माने केलेल्या फटकेबाजीपासून ते सामन्यानंतरही अनेकदा या तिघी स्टॅण्डमध्ये बसल्याचं आणि आपल्या जोडीदारांना प्रोत्साहन देताना दिसल्या. सामना संपल्यानंतरही सर्व चाहत्यांप्रमाणे या तिघीही आहे त्या स्टॅण्डमध्येच बसून होत्या. दरम्यान विजयानंतर विरोधी संघातील खेळाडूंबरोबर हस्तांदोलन करण्यासाठी सर्वच भारतीय खेळाडू मैदानात आले. यामध्ये भगव्या जर्सीमधील विराट कोहलीचाही समावेश होता.
नक्की वाचा >> भारताच्या विजयानंतर इस्रायलने उडवली पाकची खिल्ली! म्हणाले, 'पाकिस्तानला हमासच्या दहशतवाद्यांना...'
सर्वांशी हस्तांदोलन करुन झाल्यानंतर विराटने मैदानामधूनच अनुष्का बसलेली त्या स्टॅण्डकडे पाहिलं आणि तिला खाणाखुणा करुन काहीतरी सांगू लागला. डाव्या हातामध्ये जर्सी पकडून विराट अनुष्का बसलेल्या स्टॅण्डकडे हात उंचावून अनुष्काचं लक्ष वेधून घेतो. त्यानंतर तो हातवारे करुन एका वाक्य सांगतो. अनेकांनी या व्हायरल व्हिडीओमध्ये विराट काय म्हणतोय हे बरोबर ओळखलं आहे. बऱ्याच लोकांनी अनुष्का आणि विराट हे फारच रोमॅण्टीक कपल असल्याचं म्हटलं आहे. या दोघांमधील हा डमशरासचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
नक्की वाचा >> देव कधीच अशा लोकांबरोबर नसतो जे...; भारताच्या विजयानंतर पाकिस्तानला कनेरियाचा घरचा आहेर
तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
विराट सामन्यानंतर स्टॅण्डमध्ये बसून असलेल्या अनुष्काचं लक्ष वेधून घेत हातानेच कार ड्राइव्ह करण्याची खूण करतो. पुढे तो अनुष्काकडे पाहून हातानेच तू आणि मी आपण दोघे एकत्र असं तिला हातवारे करुन सांगतो. तसेच तिला हात दाखवून आहेस तिथेच थांब असंही विराट सांगताना दिसत आहे. म्हणजेच आपण दोघे कारने ड्राइव्ह करत एकत्रच हॉटेलवर जाऊ. तू कुठे जाऊ नकोस असं विराट तिला मैदानावरुनच खाणाखुणांच्या माध्यमातून सांगताना दिसतो.
नक्की वाचा >> एकही विकेट न घेणाऱ्या अफगाणी गोलंदाजचं सचिनकडून कौतुक! म्हणाला, 'त्याला पाहून...'
भारताविरुद्ध पाकिस्तानचा संपूर्ण संघ 191 धावांवर निर्धारित 50 ओव्हर खेळण्याआधीच तंबूत परतला. भारताने जवळपास साडेतीनच्या सरासरीने धावांचा पाठलाग करण्याची आवश्यकता असताना कर्णधार रोहित शर्माने दमदार खेळी केली. 86 धावा करुन रोहित बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरने संयमी अर्धशतक झळकावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्बत केलं. वर्ल्ड कप स्पर्धेमधील भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा 8 वा विजय ठरला.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.