World Cup 2023 AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करत वर्ल्ड कपमधील (Cricket World Cup) दुसरा विजय मिळवला. कांगारूंनी पाकिस्तानला 69 धावांनी धुळ चारली. त्यानंतर आता पाकिस्तानच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघातील फलंदाजांना पट्टीत घेतलंय. शोएब अख्तर (Wasim Akram) याने पाकिस्तानी गोलंदाजांवर आसूड ओढला. तर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम याने पाकिस्तानी फलंदाजांना झापलं आहे. अक्रमने बाबर आझमपासून (Babar Azam) रिझवानपर्यंत सर्वांची खरडपट्टी काढली. 


काय म्हणाला वसीम अक्रम ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इफ्तिकार जेव्हा चांगली फलंदाजी करत होता, तोपर्यंत पाकिस्तानचा संघ सामन्यात होता. जेव्हा तुम्हाला माहितीये की, झँम्पा तुम्हाला बॅकफूटच्या बॉलवर अडकवण्य़ाचा प्रयत्न करतोय.. तर मग तुम्ही तो बॉल खेळण्याचा प्रयत्न का केला? असा खडा सवाल वसीम अक्रम याने विचारला आहे. तुम्ही चांगली योजना आखून खेळणं गरजेचं होतं. पाकिस्तानच्या फलंदाजीने मी निराश झालोय. मला माहिती होतं की, हा सामन्यात आपला विजय होऊ शकत नाही, असं वसीम अक्रम म्हणतो.


सामन्यात मोठा डोंगर पार करायचा होता. इमामने 71 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केली. जेव्हा तुम्हाला मोठं आव्हान पार करायचं असतं तेव्हा तुम्ही नेट रननेटच्या हिशोबाने खेळावं लागतं. तुम्ही 6 च्या रननेटने धावा करता तेव्हा तुम्ही स्वत:वर दबाव तयार करता, असं म्हणत अक्रमने बाबरच्या खेळीवर देखील टीकास्त्र सोडलं. 



तुम्ही महत्त्वाच्या सामन्यांना खेळत नाही तर वर्ल्ड कप जिंकणार कसा? असा सवाल वसीम अक्रमने बाबर आझमला विचारला आहे. बाबर आझमला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकच अर्धशतक मारता आलंय. त्यानंतर त्याची बॅट फारशी चमकली नाही. त्याच्या फॉर्मवरून आता पाकिस्तानचं टेन्शन वाढलंय.


आणखी वाचा  - 'मला लाज वाटते, सेमीफायनलमध्ये पोहोचायचंय तर...', शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सुनावले खडे बोल!


दरम्यान, एका स्पोर्ट्स प्रोग्रॅममध्ये वसीम अक्रमने टीका केली. त्यावेळी शोएब मलिक देखील उपस्थित होता. मलिकने यावेळी पाकिस्तानच्या रनचेसवरून टीका केली. तुम्हाला बॉन्ड्री सोबतच स्टाईक रोटेट करणं शिकावं लागेल. त्यानंतरच तुम्ही मोठ्या पार्टनरशीप तयार करू शकता. वनडे क्रिकेटमध्ये तुम्ही टी-ट्वेंटी फॉर्मटवर जास्त काम करू शकत नाही. तुम्हाला विकेट न गमावला मैदानात टिकून रहावं लागेल, असं शोएब मलिक म्हणाला आहे.