Video: सुपरमॅन विराट! हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच; भोपळाही न फोडता फलंदाज तंबूत
Ind vs Aus Virat Kohli Excellent Catch: विराट कोहलीला जगातील सर्वोत्तम फिल्डर्सपैकी एक का म्हणतात हे या कॅचच्या माध्यमातून दिसून आलं असं म्हटलं जात आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ आणि ठरवा...
Ind vs Aus Virat Kohli Excellent Catch: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या चेन्नईमधील सामन्याच्या पहिल्या काही मिनिटांमध्येच विराट कोहलीने त्याला जगातील सर्वोत्तम फिल्डर का म्हणतात हे दाखवून दिलं आहे. विराट कोहलीने मिचेल मार्शला बाद करण्यासाठी अप्रतिम झेल घेतला. सध्या यासाठी विराटवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. विराटचा हा झेल चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी सोशल मीडियावर विराटच्या या भन्नाट कॅचचा व्हिडीओ शेअर केला आहे.
नक्की घडलं काय?
भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस उडवा आणि पॅट कमिन्सने टॉस जिंकला. पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. भारताकडून जसप्रीत बुमराहने गोलंदाजीला सुरुवात केली. दुसरं षटक मोहम्मद सिराजने टाकलं. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह आला. तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर टप्पा पडून ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मिचेल मार्शने केला. मात्र चेंडूने बॅटची कड घेतली आणि तो स्लीप आणि विकेटकीपरच्या मधून सीमारेषेकडे जाणार असं वाटत असतानाच विराटने त्याच्या डावीकडे भन्नाट झेप घेत चेंडू पकडला. विराटने अगदी हवेत असतानाच चेंडू पकडल्याचं पाहून मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
भोपळाही न फोडता सलामीवीर तंबूत
ऑस्ट्रेलियन सलामीवीर मिचेल मार्श 5 चेंडू खेळून भोपळाही न फोडता तंबूत परतला. विराटने घेतलेला झेल पाहून समालोचकांनीही त्याच्या रिफ्लेक्सेसचं म्हणजेच प्रतिसादासाठी लागणारा वेळ फारच कमी होता असं म्हणत त्याचं कौतुक केलं.
1) फिटनेस पाहा
2) सर्वोत्तम फिल्डर
3) जवळून पाहा हा व्हिडीओ
ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या मैदानावर दोन्ही संघांनी धावांचा पाठलाग करताना प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी घेऊन मोठा स्कोअर उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरल्याचं दिसत आहे. भारतीय फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर हा सामना हाय स्कोअरिंग होणार का हे ठरेल.