6 वर्षानंतर मैदानात पहिल्यांदाच दिसलं हे चित्र! विराटला पाहताच पुणेकर चेकाळले; पाहा Video
World Cup 2023 India vs Bangladesh Virat Kohli: बांगलादेशची फलंदाजी सुरु असतानाच सामन्यातील 9 व्या ओव्हरला हा संपूर्ण प्रकार घडला. सोशल मीडियावर याची तुफान चर्चा आहे.
World Cup 2023 India vs Bangladesh Virat Kohli: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या सलामीवीरांनी संघाचा चांगली सुरुवात करुन दिली. मात्र या सामन्यातील 9 व्या ओव्हरमध्ये असं काही घडलं की संपूर्ण मैदान भारतीय गोलंदाजी सुरु असताना 'कोहली कोहली...' च्या घोषणा देऊ लागले. या घोषणाबाजीमधील कारणही तसं खास होतं कारण अर्धी ओव्हर संपलेली असताना अचानक ओव्हरमधील 3 बॉल टाकण्यासाठी विराट कोहलीने चेंडू हाती घेतला.
नेमकं घडलं काय?
झालं असं की, बांगलादेशचा संघ 8 ओव्हरनंतर 39 धावांवर खेळत होता. हार्दिक पंड्याने 9 वी ओव्हर टाकण्यास सुरुवात केल्यानंतर पहिल्या 3 चेंडूंमध्ये तनझीद हसनने 2 चौकार लगावले. यापैकी तिसऱ्या चेंडूवरील चौकार अडवण्याचा हार्दिक पंड्याने पायाने प्रयत्न केलाय. मात्र या प्रयत्नात हार्दीक पंड्याचा पाय घसरला आणि तो पडला. या प्रयत्नामध्ये त्याला उजवा पाय दुखापत झाली. यानंतर उठून हार्दिक पंड्या परत गोलंदाजी करण्यासाठी गेला असता तो लंगडू लागला. त्याने रनअप घेण्याचाही प्रयत्न केला. पण त्याला धावता येत नसल्याने त्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. फिजिओंच्या मदतीने पंड्या मैदानाबाहेर गेला.
केवळ 3 बॉल अन्...
हार्दिक पंड्याच्या ओव्हरमधील उरलेले 3 चेंडू कोण टाकणार असा प्रश्न असतानाच विराट कोहलीच्या हाती चेंडू सोपवण्यात आला. विराटचा पहिला चेंडू निर्धाव गेला. उरलेल्या दोन्ही चेंडूंवर प्रत्येकी एका धाव काढण्यात आली. विराट कोहली तब्बल 6 वर्षानंतर गोलंदाजी करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. सोशल मीडियावर विराटच्या गोलंदाजीचीच चर्चा आहे. विराटच्या गोलंदाजीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. पाहुयात काही व्हायरल पोस्ट...
1) विराटची राईट आर्म क्विक बॉलिंग
2) 6 वर्षांमध्ये पहिल्यांदाच
3) वर्ल्ड कपमध्ये 8 वर्षांनी
4) 3 बॉल टाकले अन्...
5) हायलाइट्स
विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 विकेट्स आहेत. 15 धावांवर 1 गडी ही विराटची गोलंदाजीमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.