ICC Cricket World Cup 2023 : अखेर आयपीएल संपली असून टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( World Test Championship ) तयारीला लागली आहे. दरम्यान WTC नंतर देखील येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023 ) स्पर्धा खेळवली जाणार आहे. वनडे वर्ल्डकप क्रिकेट जगातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. अशातच वर्ल्डकप विजेत्या टीमवर अक्षरशः पैशांचा पाऊस पडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023 ) ही मोठी स्पर्धा असून विजेत्या टीमला मिळणारे पैसे देखील बक्कळ असतात. यंदाचा वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमला 4 मिलियन डॉलर मिळणार असल्याची माहिती आहे. टोटल स्पोर्टल या वेबसाईटने वनडे वर्ल्डकपमध्ये कोणत्या टीमला किती पैसे मिळणार याची माहिती दिली आहे. यानुसार वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023 ) विजेत्या टीमला जवळपास भारतीय रूपयांमध्ये 33 कोटी मिळू शकणार आहेत. 


रनर अप टीमला किती मिळणार पैसे?


टोटल स्पोर्टल या इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी वनडे वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023 ) जी टीम जिंकेल त्यांना 33 कोटी रूपयांचं बक्षीस मिळणार आहे. दरम्यान आयसीसीने अजून अधिकृतरित्या याची माहिती जाहीर केलेली नाही. तर दुसरीकडे रनअप टीमला 2 मिलियन डॉलर मिळणार आहेत.


याशिवाय सेमीफायनलमध्ये हरणाऱ्या टीमला 8 लाख डॉलर म्हणजेच 6.61 कोटी रूपये मिळणार आहेत. तसंच लीग टप्प्यातील प्रत्येक सामन्यातील विजेत्या टीमला 40 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 33 लाख रुपये मिळू शकणर आहे. त्यामुळे जर टीम इंडिया ( Team India ) वनडे वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023 ) जिंकली तर भारतीय खेळाडू नक्कीच मालामाल होणार आहेत. 


भारतात होणार यंदाचा वर्ल्डकप


ICC 2023 वनडे वर्ल्ड कप ( ICC Cricket World Cup 2023 ) यंदाच्या वर्षी भारतात  (World Cup 2023) खेळवला जाणार आहे. 2011 साली टीम इंडियाने भारतात वर्ल्डकप जिंकला होता. याला आता 12 वर्ष उलटून गेली आहेत. मात्र यंदाचा वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023 ) भारतातच असल्याने भारत ( Team India ) याचा प्रबळ दावेदार मानला जातोय. भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळवले जाणार आहेत.