भारताने केलेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाचे माजी कर्णधार रमीज राजा चांगलेच संतापले आहेत. पाकिस्तान संघाचा पराभव हा दुखावणारा आणि भीतीदायक असल्याचं सांगत रमीज राजा यांनी संघाला खडे बोल सुनावले आहेत. भारताने पाकिस्तान संघाला 191 धावातच गुंडाळलं आणि नंतर कर्णधार रोहित शर्माच्या तडाखेबंद खेळीच्या आधारे 7 गडी आणि 20 ओव्हर्स राखून सामना जिंकला. "हा पराभव त्यांना दुखावणारा आहे. हे भीतीदायक असून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात त्यांनी खराब कामगिरी केली आहे," असं रमीज राजा म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही जिंकू शकत नसाल तर किमान त्यांना चांगली झुंज तरी द्या. पाकिस्तान संघ हे करण्यात असक्षम ठरला आहे असं रमीज राजा यांनी सांगितलं आहे. एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 7 वेळा भारत-पाकिस्तान संघ एकमेकांशी भिडले असून सर्व सामने भारताने जिंकले आहेत. नरेंद्र मोदी स्टेडिअममधील सामन्यात पाकिस्तान संघ हा नकोसा रेकॉर्ड मोडेल अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा होती. पण पुन्हा एकदा पाकिस्तान संघ अपयशी ठरला असून आता रेकॉर्ड 8-0 असा झाला आहे. रमीज राजा यांनी हा रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी वेगळा मार्ग शोधण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. 


"हे सत्य असून, पाकिस्तानने यासंदर्भात काहीतरी करण्याची गरज आहे. भारताविरोधात ते चोकर्स म्हणून ओळखले जाऊ शकत नाहीत. हा काही महान टॅग नाही. हा एक वैचारिक आणि कौशल्याला रोखणारा ब्लॉक आहे," असं पाकिस्तानच्या 1992 वर्ल्डकप विजेत्या संघाचे खेळाडू रमीज राजा म्हणाले आहेत. 


भारताविरोधातील सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंवर प्रचंड दबाव असतो हे मान्य करताना रमीज राजा यांनी आता खेळाडूंनी त्यातून उभरण्याची गरज बोलून दाखवली. "जेव्हा तुम्ही भारताविरोधात खेळत असता, तेव्हा मैदानात 99 टक्के भारतीय प्रेक्षक असतात. त्यामुळे ते एक वेगळं वातावरण असतं. मी या सगळ्या गोष्टी समजू शकतो. पण बाबर आझम गेल्या चार ते पाच वर्षांपासून संघाचं नेतृत्व करत आहे. त्याने आता अशा क्षणांमध्ये उत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा आहे," असं रमीज राजा यांनी सांगितलं.


'जर तुझ्या पुतण्याला कोहलीचं टी-शर्ट हवं असेल...', वसीम अक्रम बाबर आझमवर संतापला, 'हेच करायचं असेल तर...'


 


रमीज राजाने यावेळी पाकिस्तानी खेळाडूंना दबावात कसं खेळावं हे भारतीय खेळाडूंकडून शिका असा सल्लाही दिला. "वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरोधातील सामन्यात आपलं अस्तित्व राखल्याबद्दल भारताचं कौतुक करावं लागेल. या सामन्यात भावना, अपेक्षा असल्याने त्यांच्यासाठीही फार काही सोपं नसतं. तसंच तुम्ही इतक्या वर्षांपासून जिंकत असल्याने तुमच्यावर पुन्हा एकदा जिंकण्याचा एक वेगळा दबाव निर्माण होण्याची भीती असते. पण त्यांना परिस्थिती फार चांगल्या प्रकारे हाताळली," असं कौतुक रमीज राजा यांनी केलं.


'BCCI चा कार्यक्रम वाटत होता,' म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या कोचवर अक्रम संतापला, म्हणाला 'तुम्ही आधी कुलदीपला...'


 


"बाबर आझम आणि इतर वरिष्ठ खेळाडूंनी तरुण खेळाडूंशी संवाद साधत उत्तर शोधण्याची गरज आहे. या टीम मीटिंगमध्ये त्यांना सडेतोडपणे सत्य स्थिती सांगायला हवी. पाकिस्तानने येथूनच सुरुवात करायला हवी," असा सल्ला रमीज राजा यांनी दिला आहे.