वर्ल्डकप स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा दणदणीत पराभव केल्यानंतर बोर्ड खडबडून जागं झालं आहे. भारताने तब्बल 302 धावांनी पराभव केल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने (SLC) तात्काळ आणि सर्वसमावेशक स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. प्रशिक्षक कर्मचारी आणि निवडकर्त्यांकडून हे स्पष्टीकरण मागण्यात आलं असल्याचं वृत्त ESPNcricinfo ने दिलं आहे. मुंबईतीन वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फंलदाजी करताना 357 धावा केल्या होत्या. पण श्रीलंका संघ 19 ओव्हर्समध्येच 55 धावांवर गारद झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघाच्या पराभवामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्ड नाराज असून स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे.  संघाचे अलीकडील पराभव धक्कादायक आहेत. संघाची तयारी, रणनीती आणि कामगिरीवर यामुळे प्रश्न उपस्थित होत असल्याचं बोर्डाने सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आम्ही पारदर्शकतेवर विश्वास ठेवणारे असून, या समस्या त्वरित सोडवण्यास महत्त्व देत असल्याचंही स्पष्ट केलं आहे.


"श्रीलंका क्रिकेटने (SLC) सध्या सुरु असणाऱ्या वर्ल्डकप 2023 मध्ये राष्ट्रीय संघाच्या कामगिरीबद्दल आणि खासकरुन भारताविरुद्ध झालेल्या निराशाजनक पराभवाबद्दल तीव्र चिंता आणि निराशा व्यक्त केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोचिंग स्टाफ आणि निवडकर्त्यांकडून तात्काळ आणि सर्वसमावेशक स्पष्टीकरण दिलं जावं अशी मागणी करत आहे,” असं निवेदनात सांगण्यात आलं आहे.


"संघाचील अलीकडील एकूण कामगिरी आणि धक्कादायक पराभवांमुळे एकूण तयारी, रणनीती आणि कामगिरीवर महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण होत आहेत. श्रीलंका क्रिकेट व्यवस्थापनाने नियम आणि नियमांनुसार त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांच्या कामात कधीच हस्तक्षेप केला नाही. तथापि, श्रीलंका क्रिकेटला उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि विषयातील समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे महत्त्व यावर विश्वास आहे," असंही पुढे सांगितलं आहे.