West Indies For World Cup 2023: 70 च्या दशकात क्रिकेट जगतावर वेस्ट इंडिज (West Indias)  संघाचा दबदब होता. विंडीजच्या भेदक तोफखान्यासमोर जाण्याची कोणत्याच संघातील फलंदाजांची हिम्मत नव्हती. वेस्ट इंडिजबरोबर खेळण्यास इतर संघ अक्षरश: घाबरायचे. क्रिकेट जगतात जेव्हा निर्धारीत षटकांची विश्वचषक (ICC World Cup) स्पर्धा झाली, त्यावेळी 1975 आणि 1979 अशा सलग दोन वेळा विंडिजने विश्व चषकाचं जेतेपद पटकावलं. 1983 साली तिसऱ्यांदा विंडीज विश्व चषक जिंकणार असं वाटत असतानाच भारताने विंडिंजच्या स्वप्नांना सुरुंग लावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विंडीजचा दबदबा संपला?
एकेकाळी क्रिकेटवर दबदबा असणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ आता मात्र एकेका विजयासाठी झगडतोय. विशेषत: एकदिवसीय क्रिकेटमध्ये विंडीजचा संघ पार तळाला फेकला गेलाय. या मागचं मुख्य कारण म्हणजे विंडीज संघातील अनेक खेळाडू टी20 (T20) क्रिकेटवर फोकस करतायत. याचा परिणाम म्हणजे भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक 2023 मध्ये विडिंज संघ थेट प्रवेश करुन शकला नाही. आता विंडीज संघाला पात्रता फेरीत खेळावं लागणार आहे.


यासाठी विडिंज संघाला पुढच्या महिन्यात शारजहामध्ये होणाऱ्या युएईविरुद्ध (UAE) खेळवं लागणार आहे. पुढच्या महिन्यात 5, 7 आणि 9 जूनला वेस्ट इंडिज आणि युनायटेड अरब अमीरात संघांदरम्यान विश्वचषकासाठी पात्रता सामने (Qualifiers Round) खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिज संघाचे माजी क्रिकेटपटू जिमी एडम्स यांनी विंडीज संघ विश्व चषक स्पर्धेत खेळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 


आयर्लंडचं स्वप्नही भंगलं
2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आठ संघांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर आयर्लंडचं विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. बांगलादेश आणि आयर्लंड दरम्यानचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि आयर्लंडचं स्वप्नावरही पाणी फिरलं. 


हे आठ संघ निश्चित
भारतात या वर्षाच्या अखेरीस विश्व चषक खेळला जाणार असून यात यजमान भारतासह न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या क्षणी एन्ट्री केली. वर्ल्ड कपसाठी पात्रता सामने 18 जून ते 9 जुलै दरम्यान खेळवले जाणार आहेत. यातून दोन संघ विश्वचषक स्पर्धेत खेळतील.