IND vs AUS : विराट कोहलीला स्पेशल मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला का डिवचलं? पाहा VIDEO
World Cup 2023 : सोशल मीडियावर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये कोहलीला मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला डिवचलं.
Virat Kohli Medal : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघाची सुरुवात विजयाने झाली आहे. कांगारू ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय खेळाडूंनी दमदार सुरु केली आहे. कांगारूला 199 रन्समध्ये गुंडाळल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दोन ओव्हरमध्ये तीन विकेट गेल्यावर आता सगळं संपलं...पण विराट कोहली आणि केएल राहुल यांनी मैदान गाजवलं. दीडशतकी भागीदारी करत या दोघांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला. 3 रन्सने शतक हुकलेला नाबाद केएल राहुलला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. (World Cup 2023 virat kohli medal best fielder hardik pandya teases ishan kishan video viral on Social media)
पण भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये कोहलीला मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला डिवचलं. खरं तर ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंना मेडल्स देण्याचा सोहळा रंगला होता.
खरं तर रविवारच्या मॅचनंतर विराट कोहलीने बरेच रेकॉर्ड केले आहेत. विराट कोहलीने आजपर्यंत त्याच्या बॅटिंगने अनेक रेकॉर्ड केले आहेत. विराट कोहली आता व्हाइट बॉल ICC टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. हा रेकॉर्ड करुन त्याने सचिनचा रेकॉर्ड मोडला आहे. यासोबत त्याने अजून एक उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि तीही क्षेत्ररक्षकमध्ये.
रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरोधाच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर मिचेल मार्श बाद झाला. मिचेलला शून्यावर आऊट करण्यासाठी जसप्रीतला कोहलीने साथ दिली. त्याने ज्या प्रकारे बॉल झेलला त्यानंतर चाहते खूष झाले.
त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून विराट कोहलीला मेडल बहाल करण्यात आलं. हे मेडल देण्यासाठी भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी भारतीय संघातील विराट कोहलीच्या खेळासोबत इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचं कौतुक केलं.
त्यावेळी दिलीप यांच्या हातात गोल्ड मेडल होतं. जसं दिलीप यांनी इशान आणि श्रेयसचं कौतुक केलं लगेचच पण तो गोल्ड मेडल तुझा नाही, असं हार्दिक पांड्याने जोरात म्हणत इशान किशनला डिवचलं. या क्षणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. खेळांडूंमध्ये कायम अशी मस्ती सुरु असते आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दिलीप यांनी मेडल घेण्यासाठी विराटला बोलवलं तेव्हा ते माझ्या गळ्यात घाला असं विराट म्हणाल.