ICC ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक (ODI WC-2023) यावर्षी भारताच्या यजमानपदी खेळवला जाणार आहे. धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारी टीम इंडिया विजयी दावेदार म्हटली जात आहे. या  स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत, मात्र खेळ सुरु होण्याआधीच एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 


रोहितवर मोठी जबाबदारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकदिवसीय विश्वचषक यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतामध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. 
टीम इंडियाने 12 वर्षांपूर्वी वर्ल्डकप जिंकला होता. 2011 मध्ये अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून टीम इंडियाने एकदिवसीय विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. त्यावेळी संघाचे कर्णधारपद अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीकडे होते. आता भारताच्या अब्जावधी चाहत्यांना आनंदोत्सव साजरा करण्याची मोठी संधी देण्याची जबाबदारी रोहित शर्मावर असेल.


10 संघ होणार सहभागी 


एकदिवसीय विश्वचषकाच्या यावेळच्या सिझनमध्ये 10 संघ सहभागी होणार आहेत. यातील 8 संघ निश्चित करण्यात आले आहेत. ज्यात यजमान भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशच्या टीम्सचा समावेश आहे. उर्वरित 2 टीम्ससाठी पात्रता सामने खेळवले जात आहेत.


हे ३ संघ बाद


विश्वचषक पात्रता फेरीचा संपूर्ण निकाल येणे बाकी आहे. पण यातून 3 संघ बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भारताचे  शेजारी राष्ट्र नेपाळ आणि अमेरिका (यूएसए) या संघाचा समावेश आहे. 


याव्यतिरिक्त संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघही आयसीसी स्पर्धेच्या मुख्य गटासाठी पात्र होऊ शकला नाही. नेपाळने 4 पैकी 3 सामने गमावले आहेत तर यूएसएने तिन्ही सामने गमावले आहेत. 


युएईचा संघही तिन्ही सामने गमावल्यानंतर 'ग्रुप बी'तून बाहेर पडला आहे. यानंतर आता पात्रता फेरीत 10 संघ सहभागी होत आहेत. यापैकी 6 संघ सुपर-6 साठी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर 2 संघांना मुख्य गटात स्थान मिळणार आहे. हे २ संघ कोणते असतील याबद्दल उत्सुकता आहे.