Mercedes Benz EQB Car Launch: टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) गाड्याचं खूप वेड...अनेक निराळ्या गाड्याचं कलेक्शन धोनीच्या पार्किंगमध्ये पहायला मिळतं. अशातच मुंबईतील मर्सिडीज बेंझ ईक्यूबी इंडिया न्यू कारच्या लॉन्चिंगला (Mercedes Benz EQB Car Launch) धोनीने हजेरी लावली होती. त्यावेळी धोनीच्या हस्ते एका लक्झरी कारचं लाँचिंग देखील करण्यात आलं. मंचावर धोनीला पाहून अनेकांचा उत्साह देखील गगनात मावेनासा झाला. त्यावेळी धोनीने चाहत्यांशी संवाद साधला आणि अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने कार्यक्रमात कारमध्ये बसून स्टाईलमध्ये एन्ट्री मारली. कार्यक्रमात बोलताना धोनीने तरुणाईला (Mahendra Singh Dhoni) मोलाचा सल्ला दिला आहे. जेव्हा तुम्ही कमावायला लागाल तेव्हा सर्वात पहिल्यांदा कमाई तुमच्या पालकांना द्या, असा सल्ला धोनीने तरुण पिढीला दिला आहे. या कार्यक्रमातील धोनीचा एक व्हिडीओ (MS Dhoni Video) समोर आलाय.


आणखी वाचा - IND vs BAN : टीम इंडियाच्या पराभवाला 'हा' युवा खेळाडू ठरला कारणीभूत 


नेमकं काय म्हणाला धोनी?


गुंतवणूक (Investment) करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कुटूंबीयांची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा तुम्ही कमावायला लागाल तेव्हा तुम्ही पालकांना पैसे द्या. त्यानंतर बाकीच्या गोष्टी पाहा. पालकांना पगार देणं कधीच बंद करू नका, गुंतवणूक करायची असेल तर प्रॉपर्टीमध्ये (Property) करू शकता, असं धोनी म्हणाला आहे. 


पाहा Video - 



दरम्यान, मी माझी पहिली लक्झरी कार (Luxury car) घेतली याचा मला आनंद आहे. मालमत्तेसोबतच तुम्ही जास्तीचे पैसे कमवण्यासाठी शेअर मार्केटमध्ये (Share Market) देखील गुंतवणूक करू शकता, असा सल्ला देखील धोनीने यावेळी दिला आहे. सध्या धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.