Dhoni Cried Like Kids: भारताने वर्ल्ड कप 2023 मध्ये न्यूझीलंडला पराभूत करुन 20 वर्षांपासूनचा वर्ल्ड कपमधील किवीजवरील विजयाचा दुष्काळ रविवारी धरमशालाच्या मैदानावर संपवला. या विजयानंतर अनेकांना 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धचा सेमी फायनलाचा समाना आठवला. महेंद्र सिंग धोनीचा शेवटचा एकदिवसीय सामना ठरलेल्या या मॅचमधील पराभवाचा आणि धोनीला रन आऊट केल्याचा बदला भारतीय संघाने 4 वर्षानंतर घेतल्याची चर्चा 22 ऑक्टोबरच्या सामन्याचा निकाल लागल्यानंतर सोशल मीडियावर होती. मात्र आता याच 2019 च्या सेमी फायनलच्या सामन्यानंतरचा यापूर्वी कधीही न सांगितलेला एका किस्सा समोर आला आहे. 


आम्ही 7 सामने जिंकलो पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये भारतीय संघाचे बॅटिंग कोच असलेल्या संजय बांगर यांनी हा किस्सा सांगितला आहे. भारत 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर नेमकं काय घडलं होतं याबद्दल बांगर यांनी माहिती दिली आहे. "तो क्षण सर्व भारतीय क्रिकेटपटूंसाठी फारच मन दुखावणारा होता कारण भारतीय संघ त्यावेळी स्पर्धेत फारच उत्तम खेळ करत होता. आम्ही साखळी फेरीमध्ये 7 सामने जिंकलो होतो. त्यामुळे अशापद्धतीने बाहेर पडणं फार धक्कादायक होतं," असं बांगर म्हणाले. बांगर यांनी सेमी फायनलमध्ये पराभूत होऊन भारतीय संघ स्पर्धेबाहेर फेकला गेल्यानंतर खेळाडूंची स्थिती काय होती हे ही सांगितलं.


 नक्की वाचा >> पाकिस्तान जिंकणार 2023 चा वर्ल्ड कप? 1992 च्या वर्ल्ड कपसारखा विचित्र योग जुळून आला


धोनीसुद्धा लहान मुलासारखा रडत होता


"खेळाडू अगदी लहान मुलांसारखे रडत होते. धोनीसुद्धा लहान मुलाप्रमाणे रडत होता. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतच्या डोळ्यातही अश्रू होते. अशा गोष्टी सामान्यपणे ड्रेसिंग रुममध्ये राहतात. (त्याबद्दल कोणी वाच्यता करत नाही,)" असं बांगर यांनी सांगितलं. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान हिमाचल प्रदेश क्रिकेस असोसिएशनच्या मैदानात झालेल्या सामन्यादरम्यानच बांगर यांनी हा खुलासा केला होता.


नक्की वाचा >> 'दुसऱ्यांच्या पत्नीबरोबर फ्लर्ट केलं तर...'; चहलचा धनश्रीवरुन श्रेयस अय्यरला टोला?


भारताचा विजय अन् विराटचा फसलेला प्रयत्न


भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना 4 विकेट्स आणि 12 बॉल राखून जिंकला. या विजयासहीत भारताने वर्ल्ड कप 2023 मध्ये पाचवा विजय मिळवला तर न्यूझीलंडसाठी यंदाच्या वर्ल्ड कपमधील हा पहिलाच पराभव ठरला. भारतीय संघाने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला. या सामन्यामध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचं शतक अवघ्या 5 धावांनी हुकलं. यापूर्वी बांगलादेशविरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यामध्ये विराटने षटकार लगावत भारताला सामना जिंकून देण्याबरोबरच आपल्या एकदिवसीय कारकिर्दीमधील 48 वं शतक झळकावलं होतं. असाच प्रयत्न त्याने न्यूझीलंडविरुद्ध केला पण तो षटकार मारण्याच्या नादात झेलबाद झाला.