World Cup Final 2023 Pat Cummins On Most Dangerous Player: अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवला जाणार वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना अवघ्या काही तासांमध्ये सुरु होणार आहे. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून अनेक व्हिआयपीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. कोणत्या संघातील कोणता खेळाडू उत्तम कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच दुसरीकडे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला एका वेगळ्याच गोष्टीची भिती वाटत आहे. त्याने ही भिती शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलूनही दाखवली आहे. 


या खेळाडू सर्वात धोकादायक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पॅट कमिन्सनने मोहम्मद शमी हा ऑस्ट्रेलियन संघासाठी धोकादायक ठरु शकतो असं म्हटलं आहे. "भारतीय संघ प्रत्येक विभागात दमदार कामगिरी करत आहे. तुम्हालीही ठाऊक आहे की एक असा खेळाडू या संघात आहे जो मालिकेच्या सुरुवातीला खेळला नव्हता. मात्र नंतर त्याने उत्तम कामगिरी केली असून या खेळाडूचं नाव आहे मोहम्मद शमी. तो एक क्लासिक गोलंदाज आहे. त्यामुळेच तो आमच्यासाठी धोकादायक ठरु शकतो. मात्र आमचे गोलंदाजही आव्हान स्वीकारण्यासाठी तयार आहेत. आम्ही यापूर्वीही असे सामने खेळले आहेत. शमी असाधारण खेळाडू आहे," असं पॅट कमिन्स म्हणाला आहे. फिरकी गोलंदाजांबद्दल बोलताना पॅट कमिन्सने आम्ही कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या दोघांकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही, असं म्हटलं आहे.


विराट-रोहितसाठी खास प्लॅन


विराट कोहली आणि रोहित शर्माला बाद करण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या योजना आहेत. आम्हाला या दोघांना लवकरात लवकर बाद करावं लागेल असंही कमिन्सने म्हटलं आहे.


शमी की झाम्पा कोण ठरणार अव्वल?


शमी उत्तम गोलंदाजी करत असून त्याने वर्ल्ड कपमध्ये एकूण 23 विकेट्स घेतल्या आहेत. तो वर्ल्ड कपमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. दुसऱ्या क्रमाकांवर ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा असून त्याच्या नावावर 22 विकेट्स आहेत. त्यामुळे आता या दोघांपैकी सर्वाधिक विकेट्सचा मानकरी कोण ठरतो हे फायनलनंतरच समजेल.


भारताची वर्ल्ड कप 2023 मधील कामगिरी कशी?


भारतीय संघाचा वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. 8 ऑक्टोबरचा हा सामना भारताने 6 विकेट्स आणि 52 बॉल राखून जिंकला होता. त्यानंतर 11 ऑक्टोबरला भारताने अफगाणिस्तानला 35 ओव्हरमध्येच 8 विकेट्स राखून मात दिली. 14 ऑक्टोबर रोजी भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केलं. 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशचा संघ भारताकडून 7 विकेट्सने पराभूत झाला. भारताने तब्बल 21 वर्षानंतर वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला पराभूत करण्याचा पराक्रम 22 ऑक्टोबर 2023 रोजी केला. भारताने सामना 4 विकेट्सने जिंकला. त्यानंतर 29 ऑक्टोबरला भारताने इंग्लंडला 100 धावांनी पराभूत केलं. भारताने 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेला विक्रमी अशा 302 धावांनी धूळ चारली. दक्षिण आफ्रिकेचाही भारताने 243 धावांच्या मोठ्या फरकाने 5 नोव्हेंबर रोजी पराभव केला. साखळीफेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने नेदरलॅण्डला 160 धावांनी हरवलं.


सेमी-फायनलमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताने 70 धावांनी विजय मिळवत वर्ल्ड कप फायनलमध्ये चौथ्यांदा प्रवेश केला.


ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कप 2023 मगील कामगिरी


ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेला अडखळती सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात यजमान भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने हरवलं. त्यानंतर पुढच्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाचा पहिला विजय वर्ल्ड कपच्या 14 व्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध मिळाला. त्यांनी हा सामना 5 विकेट्सने जिंकला. ऑस्ट्रेलियाने त्यानंतर 20 ऑक्टोबरला पाकिस्तानला 62 धावांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने 25 ऑक्टोबरच्या सामन्यात नेदरलॅण्डला 309 धावांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने 28 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धचा सामना अवघ्या 5 धावांनी जिंकला. त्यानेतर 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 33 धावांनी पराभूत केलं. 7 नोव्हेंबरला अफगाणिस्तानला 3 विकेट्सने पराभूत केलेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने एकट्याने नाबाद 201 धावा केला. त्यानंतर 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धचा सामना 8 विकेट्सने जिंकला.


सेमी-फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना संघर्षपूर्ण पद्धतीने जिंकला. ऑस्ट्रेलियाने हा लो स्कोअरिंग सामना 3 विकेट्सने जिंकून फायलनमध्ये एन्ट्री मिळवली.