Six मारुन विजय मिळवल्यानंतर निराश झालेला जगातील पहिला खेळाडू! KL Rahul ने सांगितलं खरं कारण
World Cup KL Rahul Winning Six vs Australia: के. एल. राहुल आणि विराट कोहलीने केलेल्या संयमी खेळीमुळे भारताला विजय मिळाल्यानंतरही के. एल. राहुल नाराज का होता?
World Cup KL Rahul Winning Six vs Australia: आपल्या देशासाठी खेळताना आपण मारलेल्या फटक्याने संघ जिंकावा असं प्रत्येक खेळाडू वाटतं. भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनीने 2011 साली वर्ल्डकप जिंकताना मारलेला शेवटचा षटकार असो किंवा इतरही अनेक सामन्यांमध्ये थेट षटकार लगावत जिंकलेले सामने असो तो क्षण फार खास असतो. मात्र रविवारी चेन्नईत झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये अगदीच वेगळं चित्र दिसून आलं. विजयी षटकार मारल्यानंतर भारताचा मधल्या फळीतील फलंदाज के. एल. राहुल हा स्वत: निराश होऊ खाली बसला. सामान्यपणे इतर खेळाडू विजयी षटकार मारल्यानंतर मैदानात सेलिब्रेशन करतात पण के. एल. राहुलने षटकार मारल्यानंतर त्यालाच आश्चर्याचा धक्का बसला आणि तो चक्क निराश होऊ खाली बसला. नेमकं घडलं काय हे के. एल. राहुलनेच सामना संपल्यानंतर सांगितलं.
दोघांचीही शतकं हुकली
वर्ल्डकप 2023 च्या आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर 6 गडी आणि 52 चेंडू राखून विजय मिळवला. 2 धावांवर 3 गडी बाद अशी स्थिती असताना विराट कोहली आणि के. एल. राहुलने संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. चेन्नईमधील चेपॉकच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारताची सुरुवात फारच अडखळती झाली. 200 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि के. एल. राहुलने केलेल्या 165 धावांच्या पार्टनरशीपच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला. मात्र दुर्देवाने या दोघांना शतक झळकवता आलं नाही.
...तर तो 101 धावांवर पोहोचला असता
विराट 85 धावांवर बाद झाला. तर दुसरीकडे भारताला 9 ओव्हरमध्ये विजयासाठी 5 धावांची गरज असताना के. एल. राहुलला शतक झळकावण्यासाठी 9 धावांची गरज होती. फलंदाजी करणाऱ्या के. एल. राहुलने पहिला चेंडू खेळून काढला आणि दुसऱ्या चेंडूला त्याने ऑफ साईडवरुन षटकार लगावत सामना जिंकवून दिला. मात्र हा फटका मारल्यानंतर के. एल. राहुल निराश होऊ खाली बसला. यासंदर्भात सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला विचारण्यात आलं. के. एल. राहुलला आपलं एकदिवसीय सामन्यातील 7 वं शतक झळकावता आलं असतं. 1 चौकार लगावल्यानंतर विजयासाठी 1 धाव हवी असताना के. एल. राहुलने षटकार लगावला असता तर तो 101 धावांवर नाबाद राहिला असता.
निराशा
चौकार मारण्याच्या नादात त्याने चेंडू इतक्या उत्तम प्रकारे टोलावला की तो षटकार गेला आणि भारताने सामना जिंकला. मात्र भारताने सामना जिंकला तरी के. एल. राहुल नाबाद राहुनही त्याचं शतक हुकलं. तो 97 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळेच समोर असलेली शतक साजरं करण्याची संधी गमावल्याने धक्का बसल्याप्रमाणे के. एल. राहुल खाली बसला. पण सामना जिंकल्याचं सेलिब्रेशन नंतर त्याने केलं. के. एल. राहुलचा हा निराश फोटो पाहून अनेकांनी संघाला विजय मिळवून दिल्यानंतर निराश होणारा हा पहिलाच खेळाडू असेल असं म्हणतं यावर मजेदारपद्धतीने भाष्य केलं आहे.
1)
2)
3)
त्यानेच केला खुलासा
सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर के. एल. राहुलने आपण शतकाचा विचार करत होतो असं स्पष्टपणे सांगितलं. शेवटच्या फटक्यानंतर ती निराश झाल्याचं दिसलं, असं म्हणत के. एल. राहुलला प्रश्न विचारण्यात आलं. त्यावर, "(शेवटचा फटका) मी फार छान मारला. मला चौकार आणि षटकार मारुन शतक झळकावण्य्चा विचार करत होतो. अपेक्षा आहे की इतर सामन्यांमध्ये मी हे करुन दाखवेन," असं उत्तर के. एल. राहुलने दिलं.