IND vs SA : असा `किंग` होणे नाही! 49 वं शतक ठोकत Virat Kohli ने रचला इतिहास; सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी
Virat Kohli 49th Century : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याने साऊथ अफ्रिकाविरुद्ध (IND vs SA) शतक ठोकत इतिहास रचला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डची (Sachin Tendulkar Record) विराटने बरोबरी केलीये.
IND vs SA, Virat Kohli's Century : सचिनसारखा कोणी नाही रे... सचिन फक्त एकच, असं लहान असताना तुम्ही देखील म्हटलं असेल. मात्र, वेळ पुढे गेला अन् सचिनची (Sachin Tendulkar) भविष्यवाणी खरी ठरली. विराट कोहली (Virat Kohli) माझा विक्रम मोडेल, असं भाकित सचिन तेंडूलकरने केलं होतं. अशातच आता विराट कोहलीने सचिन तेंडूलकरच्या महान विक्रमाची बरोबरी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये (ODI Cricket) सचिन तेंडूलकरच्या नावावर सर्वाधिक 49 शतकांचा विक्रम होता. आता विराट कोहलीने 49 शतकं पूर्ण केली आहेत. योगायोग म्हणजे विराटने त्याच्या बर्थडे (Virat Kohli's Birthday) दिवशी आपल्या करियरमधील 49 वं शतक पूर्ण केलंय. त्यामुळे आता असा किंग होणे नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
विराटचं वनडे करियर
विराट कोहलीने आत्तापर्यंत 289 वनडे सामने खेळले असून त्यात त्याने 58.43 च्या सरासरीने आणि 93.55 च्या स्टाईक रेटने धावा खेचल्या आहेत. 1275 फोर आणि 149 सिक्स असा भन्नाट रेकॉर्ड विराटच्या नावावर राहिला आहे.
कोलकता ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रीकेचा विरुद्ध भारताने नाणेफेक जिंकला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. नियोजनाप्रमाणे रोहित आणि प्रिन्स शुभमन गिलने दमदार सुरूवात करून दिली. मात्र, सहाव्या ओव्हरमध्ये रोहित बाद झाला. तर 11 व्या ओव्हरमध्ये शुभमन गिल देखील फिरकीच्या जाळ्यात अडकला. तर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यर आणि विराटने साऊथ अफ्रिकेच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरू केलं. अय्यरने 77 धावांची विराट खेळी केली. मात्र, विराटने मैदानात पाय जमवले अन् वनडे क्रिकेटमधील अविश्वनीय कामगिरी करून दाखवली. विराटची स्वप्नपूर्ती (Virat Kohli 49th Century) झाली.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग-11 : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.
टीम इंडियाची प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.