IPL 2023 फायनलबाबत नवा विक्रम, रात्री उशिरा इतक्या कोटी लोकांनी पाहिला सामना
IPL 2023 Final : IPL 2023 फायनलबाबत नवा विक्रम नोंदवला गेला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023च्या (IPL 2023) अंतिम सामन्यादरम्यान अधिकृत डिजिटल स्ट्रीमिंग भागीदार Jio Cinema ने जागतिक डिजिटल व्ह्यूअरशिप रेकॉर्ड मोडला.
IPL 2023 Final 3.2 Crore Viewers : IPL 2023 चा अंतिम सामन्याबाबत प्रेक्षकांचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. जगातील लाइव्ह स्ट्रीमिंग इव्हेंटचा सर्वाधिक दर्शक संख्या असल्याचे समोर आले आहे. IPL 2023 चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान, IPL 2023 चे अधिकृत डिजिटल स्ट्रीमिंग भागीदार Jio Cinema ने सोमवारी जागतिक डिजिटल व्ह्यूअरशिप रेकॉर्ड तोडला. हा सामना रात्रीपर्यंत खेळला गेला आणि कोट्यवधी चाहते या सामना पाहण्यासाठी जागे होते.
फायनल पाहण्यासाठी प्रेक्षकसंख्येचा विश्वविक्रम
PL 2023 चा अंतिम सामना JioCinema वर एकाच वेळी 3.2 कोटी लोकांनी पाहिला, जो जगातील लाइव्ह स्ट्रीमिंग इव्हेंटचा सर्वाधिक दर्शक आहे. IPL 2023 च्या क्वालिफायर 2 दरम्यान, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील पहिल्या डावात शुभमन गिलच्या शानदार शतकाचा साक्षीदार होण्यासाठी विक्रमी 2.57 कोटी प्रेक्षकांनी Jio सिनेमावर एकाच वेळी सामना पाहण्यासाठी ट्यून केले.
डिस्ने हॉटस्टारचा विक्रम मोडीत
डिस्ने हॉटस्टार, IPL चे माजी डिजिटल स्ट्रीमिंग भागीदार, जुलै 2019 मध्ये क्रिकेट सामन्यासाठी एकाच वेळी 2.5 कोटीहून अधिक दर्शकांना आकर्षित केले. अनेक वर्षे हा विक्रम कोणीही मोडू शकला नाही. इतकेच नाही तर 17 एप्रिल रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध MS धोनीच्या CSK चा सामना पाहण्यासाठी सुमारे 2.4 कोटी दर्शक एकत्र आले होते.
Jio Cinema ने डिजिटल स्पोर्ट्स पाहण्याच्या जगात जागतिक बेंचमार्क सेट करणे सुरुच ठेवले आहे. यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सात आठवड्यात 1,500 कोटींहून अधिक व्हिडिओ पाहिले गेले. आयपीएलच्या 16व्या सिझनमध्ये, चेन्नई सुपर किंग्सने मोदी स्टेडियमवर पावसाने अडथळा आलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पाच विकेट्सने पराभव करुन पाचवे आयपीएल विजेतेपद जिंकले आहे.
शुभमन गिल सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज
गुजरातकडून खेळाताना अंतिम सामन्यात 39 धावा करणाऱ्या शुभमन गिल हा आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. दरम्यान, विराट कोहली आघाडीवर आहे. त्याने 2016 च्या आयपीएलमध्ये 973 धावा केल्या होत्या, तर गिलने चालू हंगामात 890 धावा केल्या आहेत. गिलने या सामन्यात जोस बटलरचा 863 धावांचा विक्रम मोडला. तसेच विराट कोहलीचाही मोठा विक्रम मोडीत काढत गिल नंबर-1 बनला. खरे तर, गिलने एका मोसमात फिरकी गोलंदाजांविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा कोहलीचा विक्रम मोडला आहे. कोहलीने 2016 च्या आयपीएलमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध 364 धावा केल्या होत्या. विराटचा हा विक्रम आता शुभमन गिलने मोडला आहे. या सामन्यात फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याने 40 धावा करताच हा विक्रम आपल्या नावावर केला. गिलने या मोसमात फिरकी गोलंदाजांविरुद्ध 378 धावा केल्या आहेत.