World Test Championship: भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यामध्ये तिसरी टेस्ट इंदूरमध्ये खेळवली जातेय. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाची काही फारशी चांगली सुरुवाच झाली नाहीये. टीम इंडियाचा (Team India) पहिला डाव पहिल्याच दिवशी अवध्या 109 रन्सवर आटोपला. तर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात केवळ 197 रन्स करण्यात आले. 88 रन्सची आघाडी घेऊन ऑस्ट्रेलिया (Australia) पुन्हा गोलंदाजीसाठी उतरली, मात्र यावेळीही टीम इंडियाला काही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 


इंदूरमध्ये खराब कामगिरीनंतर फिस्कटणार World Test Championship चं गणित


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूरची टेस्ट मॅच टीम इंडियासाठी फार महत्त्वाची मानली जातेय. जर या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात एन्ट्री होणार आहे. मात्र जर या सामन्यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला तर टीम इंडियाचं फायनलमध्ये जाण्याचं संपूर्ण गणित फिस्कटू शकतं. 


तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया पराभवाच्या छायेत


इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना खेळवण्यात येतोय. या सिरीजमध्ये टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र तिसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार आहे. या सामन्याच्या निर्णयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये मोठी घडामोड होऊ शकते. टीम इंडियाला जर फायनल गाठायची असेल तर अहमदाबाद टेस्ट कोणत्याची परिस्थितीत जिंकावीच लागणार आहे.


न्यूझीलंड-श्रीलंकेवर टीम इंडिया अवलंबून?


जर ऑस्ट्रेलियाविरूद्धची सिरीज 2-1 ने टीम इंडियाने जिंकली किंवा 2-2 अशी ड्रॉ जरी झाली तर भारताला न्यूझीलंड-श्रीलंकेच्या सिरीजच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागेल. त्यामुळे अशा परिस्थितीत या सिरीजमध्ये न्यूझीलंड श्रीलंकेविरूद्ध दोन्ही सामने जिंकणं टीम इंडियासाठी फायदेशीर ठरणार आहे. न्यूझीलंड विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये न्यूझीलंडचच पारड जड मानलं जातंय. 


ऑस्ट्रेलियाला एक सामना करावा लागेल ड्रॉ


दुसरीकडे आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलिया टीमसाठी आता समीकरण एकदम सोप आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गाठायची असेल तर ऑस्ट्रेलियाच्या टीमना भारताविरूद्ध एका सामन्यात पराभव वाचवावा लागणार आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलिया 3-0 किंवा 3-1 ने सिरीज हरून देखीळ फायनलमध्ये क्वालिफाय करू शकते. मात्र जर ऑस्ट्रेलिया दोन्ही सामने हरली तर श्रीलंकेला फायनलमध्ये जाण्यासाठी न्यूझीलंडला दोन्ही सामन्यात हरवावं लागेल. असं नाही झालं तर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल रंगेल.


इंदूर टेस्टची परिस्थिती


इंदूर टेस्ट सामन्यामध्ये प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय टीमने आपल्या डावात केवळ 109 रन्स केले. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 रन्सची खेळी केली. टीम इंडियाकडून कोणत्याही खेळाडूला 30 रन्सचा आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियन टीमकडून स्पिनर मॅथ्यू कुहनमॅनने सर्वाधिक 5 आणि नॅथन लायनने 3 विकेट्स घेतले. तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 रन्समध्ये आटोपला.