मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची प्रतीक्षा संपूर्ण जगाला आहे. दुपारी 3 वाजता साऊथेप्टम इथे हा सामना सुरू होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पहिल्याच दिवशी मात्र पावसाचं सावट असल्याचं दिसत आहे. इंग्लंडमध्ये पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे हा पाऊस सामन्यात अडथळा आणू शकेल असा प्राथमिक अंदाज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर हवामान विभागाने 19 आणि 20 जून रोजी हवामान खराब असेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र पहिल्याच दिवशी पावसाचं आगमन झालं. त्यामुळे काहीशी चिंता देखील आहे. या पावसामुळे आजचा खेळ तर बिघडणार नाही ना अशी धाकधूक आहे. आज दुपारी 3 वाजता सामना सुरू होणार आहे त्यावर पावसाचं सावट मात्र कायम आहे. 




भारतीय संघात जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजाना संधी देण्यात आली असून रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन आश्विन या दोन्ही फिरकीपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी न्यूझीलंड विरुद्ध मैदानात उतरणार आहेत. 


किवी टीममध्ये 15 खेळाडू कोण? 


केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे, कोलिन डि ग्रँडहोम, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलर, नील वैगनर, बीजे वाटलिंग, विल यंग या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.