मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना आज होणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. तिथल्या वातावरणात बदल झाल्यानं त्याचा परिणाम खेळावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचा अंतिम सामना रंगण्याआधी भर पावसात युवकांचा क्रिकेटचा सामना रंगला. या सामन्यात झालेल्या मातीच्या चिखलामुळे खेळाडू घसरुन पडत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याआधी सोशल मीडियावर युवकांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये युवक क्रिकेट खेळताना दिसत आहेत. मैदानात पावसामुळे खूप चिखल झाल्याने युवक यावरून घसरत आहेत. साउथेप्टनमध्ये पाऊस झाला तर अशी परिस्थिती होईल असंही सोशल मीडियावर कॅप्शनमध्ये अनेकांनी म्हटलं आहे. या व्हिडीओवर खूप कमेंट्स येत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. 





वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची प्रतीक्षा संपूर्ण जगाला आहे. दुपारी 3 वाजता साऊथेप्टम इथे हा सामना सुरू होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पहिल्याच दिवशी मात्र पावसाचं सावट असल्याचं दिसत आहे.


भारतीय संघात जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजाना संधी देण्यात आली असून रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन आश्विन या दोन्ही फिरकीपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी न्यूझीलंड विरुद्ध मैदानात उतरणार आहेत.