मुंबई: कोरोनामुळे IPL 2021चे सामने स्थगित करण्यात आले आहेत. तर 18 ते 22 जून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड विरुद्ध टेस्ट सामन्यासाठी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रवींद्र जडेजा आणि हनुमान विहारीची संघात पुन्हा एन्ट्री झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात यावेळी मात्र भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली नाही. भुवीला संघात न घेतल्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर चर्चांना पेव फुटला आहे. 


भुवनेश्वर कुमारने इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिजमध्ये त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाकडून IPLमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतरही BCCIने भुवीला टीम इंडियामध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी संधी दिली नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. भुवीने 2018मध्ये टीम इंडियाकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर सतत दुखापतीमुळे तो सामन्यातून बाहेर राहात होता. आयपीएलदरम्यान देखील भुवीला दुखापत झाल्यामुळे तो काही सामने खेळू शकला नव्हता. 


आयएएनएसच्या वृत्तानुसार निवड समितीनं भुवीची निवड केली नाही कारण तो खेळाच्या प्रदीर्घ स्वरूपाच्या फिटनेसविषयी निश्चित नव्हता. त्याला सतत्यानं दुखापत होत होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवड समितीच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की भुवनेश्वरला अशी अवस्था असताना 4 महिने एवढ्या लांब इंग्लंड दौऱ्यावर घेऊन जाणं योग्य वाटत नाही. 


टीम इंडियामध्ये भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आहेत. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना संघात जागा मिळाली आहे. त्यामुळे भुवी उणीव टीम इंडियाला खेळताना जाणवणार नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 


भुवनेश्वर कुमारने कसोटी सामन्यात टीम इंडियामधून  2013 मध्ये पदार्पण केलं. त्यानंतर आतापर्यंत तो केवळ 21 कसोटी सामने खेळला. त्याने 26.09 च्या सरासरीने 63 विकेट्स घेतल्या. श्रीलंका दौर्‍यावर भुवनेश्वर कुमारला टीम B साठी निवड होणं अपेक्षित आहे. श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरिज आणि टी 20 सीरिज  खेळली जाणार आहे. या दौर्‍यात भुवनेश्वरला भारतीय संघाचा कर्णधारही नेमले जाऊ शकते असा अंदाज आहे.