भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC2021 अंतिम सामन्याच्या तिकीटाची किंमत ऐकून व्हाल थक्क
टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्याची तयारी करत आहे. 2 जून रोजी इंग्लंडला जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपचा अंतिम सामना होणार आहे.
मुंबई: टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्याची तयारी करत आहे. 2 जून रोजी इंग्लंडला जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपचा अंतिम सामना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या अंतिम सामन्याची चाहते आतूरतेनं वाट पाहात आहेत. या सामन्यासाठी कोरोनाचे नियम पाळून नागरिकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली आहे. मात्र तिकीटाच्या किमती ऐकून थक्क व्हाल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी हजारो नाही तर लाखो रुपये खर्च केले आहेत. 2 लाख रुपयांना देखील तिकीटांची विक्री झाल्याची माहिती मिळाली आहे. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार 2 लाख रुपये देऊन चाहते सामना पाहण्यासाठी तिकीट घेत आहेत.
इंग्लंड आणि न्यूझीलंड मध्ये होणाऱ्य़ा सामन्यासाठी देखील प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळणार आहे. 18000 प्रेक्षका हा सामना पाहणार आहेत. इंग्लंडच्या स्टेडियमवर लहान मुलांना प्रवेश नसणार आहे. तर भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी देखील
टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामना खेळल्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 4 ऑगस्टला सुरु होईल. दुसरा कसोटी सामना 12 ते 16 त्यानंतर तिसरा 25 ते 29 आणि चौथा कसोटी सामना 10 ते 14 सप्टेंबर रोजी होणार आहे.
टीम इंडियामध्ये कोणकोण?
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, ऋद्धिमान साहा.