मुंबई: कोरोनाचं थैमान असल्यामुळे IPL स्थगित करावी लागली आहे. IPLपाठोपाठ पाकिस्तान प्रीमियर लीगवरही कोरोनाचं संकट आहे. तर जून महिन्यात 18 ते 22 दरम्यान ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. हा सामना न्यूझीलंड विरुद्ध भारत होणार आहे. या सामन्यासाठी नुकतीच टीम इंडियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडमधील साउथेम्प्टन इथे हा सामना होणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी नुकतीच टीम इंडियाच्या निवडीची घोषणा झाली. हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला संघातून डिच्चू देण्यात आला आहे. तर ऋद्धिमान साहा आणि के एल राहुल पूर्णपणे बरे झाल्यानंतर टीम इंडियामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. 



टीम इंडियामध्ये कोणकोण असणार?


रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधारन), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, ऋद्धिमान साहा (फिटनेस क्लिअरन्सच्या आधीन) 


कोरोना आणि बायो बबल या सगळ्याचा विचार करता टीम इंडिया इंग्लंडसाठी 2 जून रोजी रवाना होईल असं सांगितलं जात आहे. साउथेम्प्टन इथे टीम इंडिया राहणार आहे. 


भारत विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून नॉटिंघममध्ये सुरू होणार आहे. दुसरा कसोटी सामना 12 ऑगस्ट रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाईल. मालिकेचा तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्ट रोजी लीड्स येथे होईल. चौथा कसोटी सामना 2 सप्टेंबरपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर होईल. पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना मॅनचेस्टरमध्ये 10 सप्टेंबरपासून होईल. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीलाही संघातून वगळण्यात आलं आहे.