मुंबई: टीम इंडिया WTC 2021चा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचली आहे. तिथे साउथेम्प्टममध्ये टीम इंडिया क्वारंटाइ आहे. तीन दिवस खेळाडू एकमेकांना भेटू शकणार नाही. अशी सगळी परिस्थिती असताना टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजनं चक्क रोहित शर्माची तक्रार केली आहे. या मजेशीर तक्रार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीसीसीआयने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळाडूंनी भारत ते इंग्लंड प्रवासादरम्यान खेळाडूंनी विमानात काय काय केलं सांगितलं आहे. BCCIने टीम इंडियाच्या इंग्लंडच्या प्रवासाचा एक छोटा व्हिडिओ ट्वीट केला आहे. 'टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहचताच उत्कंठा शिगेला ’ असं कॅप्शन देखील दिले आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडूंनी चित्रपट पाहाणे आणि झोप काढणं अशा दोन गोष्टी केल्या आहेत. 



या व्हिडीओमध्ये मोहम्मद सिराज हिटमॅन रोहित शर्माची तक्रार करताना दिसत आहे. रोहितने मला झोपू दिलं नाही. विमानातून उतरण्याआधी केवळ दोनच तास झोप मिळाल्याचं मोहम्मद सिराजनं सांगितलं आहे.


टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध WTC 2021 चा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू आता साऊथेम्प्टममध्ये कडक क्वारंटाइनमध्ये आहेत.