एंटिगा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा तब्बल ३१८ रननी दणदणीत विजय झाला. याचबरोबर २ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताने १-०ने आघाडी केली आहे. टेस्ट चॅम्पियनशीपमधली भारताची ही पहिलीच मॅच होती. या मॅचमध्ये विजय मिळवून भारताने आपल्या टेस्ट चॅम्पियनशीपच्या प्रवासाला दिमाखात सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्याच मॅचमध्ये विजय मिळवल्यामुळे भारत ६० पॉईंट्ससह संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या टेस्टमध्ये श्रीलंकेचा पराभव केल्यामुळे न्यूझीलंडचेही ६० पॉईंट्स झाले आहेत. सोमवार सकाळपर्यंत न्यूझीलंड शून्य पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर होती, पण श्रीलंकेचा पराभव केल्यामुळे त्यांना ६० पॉईंट्स मिळाले. याचसोबत श्रीलंका-न्यूझीलंडमधली ही टेस्ट सीरिज १-१ने बरोबरीत सुटली.


न्यूझीलंडविरुद्धची पहिली मॅच जिंकल्यामुळे श्रीलंकेलाही ६० पॉईंट्स मिळाले आहेत. त्यामुळे श्रीलंकाही संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया ३२ पॉईंट्ससह चौथ्या, इंग्लंडही ३२ पॉईंट्ससह पाचव्या आणि वेस्ट इंडिज शून्य पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट चॅम्पियनशीपच्या सामन्यांना अजूनही सुरुवात झालेली नाही.