`वर्ल्ड वुमन युथ बॉक्सिंग`मध्ये भारताला ५ सुवर्णपदकं
गुवाहाटीमध्ये झालेल्या वर्ल्ड वुमेन्स युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतानं पाच गोल्ड मेडल्सची कमाई केली.
गुवाहाटी : गुवाहाटीमध्ये झालेल्या वर्ल्ड वुमेन्स युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतानं पाच गोल्ड मेडल्सची कमाई केली.
भारताच्या नितूला 48 किलो वजनीगटात, ज्योती ज्युलियाला 51 किलो वजनीगटात, साक्षी चौधरीला 54 किलो वजनीगटात, शशी चोप्राला 57 किलो वजनीगटात आणि अंकुशिता बोरोला 64 किलो वजनीगटात गोल्ड मेडल मिळालं.
पाच गोल्ड मेडल्सची कमाई
गोल्ड मेडलची कमाई करत ज्योतीनं पुढच्या वर्षी होणाऱ्या युथ ऑलिम्पिक गेम्सचं तिकीटही मिळवलं आहे. त्याचप्रमाणे भारताला नेहा यादव आणि अनुपमानं ब्राँझ मेडल पटकावून दिलं. 5 गोल्ड आणि 2 ब्राँझ मेडलसह भारतीय बॉक्सिंग टीमनं या टुर्नामेंटमध्ये अव्वल क्रमांक पटकावलं.