मुंबई : रवी शास्त्री (Ravi Shastri) हे सध्या ब्रिटनमधील द हंड्रेड स्पर्धेत स्काय स्पोर्ट्ससाठी समालोचन करत आहेत. पण या दरम्यान रवी शास्त्रींनी लॉर्ड्समधील एक खास फोटो शेअर केला ज्यामध्ये मुकेश अंबानी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई देखील त्यांच्यासोबत दिसत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर फोटो पोस्ट करत रवी शास्त्री यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या दोन लोकांची शानदार कंपनी. श्री मुकेश अंबानी आणि श्री सुंदर पिचाई.' केविन पीटरसनने रवी शास्त्रींच्या या खास फोटोवर प्रतिक्रिया देत हा खास इमोजी शेअर केला.



मुकेश अंबानी (Mukesh Ambani) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत तर सुंदर पिचाई (Sundar Pichai) Google चे सीईओ आहेत.


रवी शास्त्री यांनी शेअर केलेला हा फोटो सध्या चर्चेत आहे. कारण देखील त्याला तसंच आहे. कारण जगातील 2 मोठ्या व्यक्ती त्यांच्या सोबत आहेत.