जर चित्त्याची शर्यत सर्वात वेगवान कारशी झाली तर...
चित्त्याने आश्चर्यकारकरित्या १०० किमी / तास वेग धारण करत आघाडी घेतली.
लंडन : चित्त्याने आश्चर्यकारकरित्या १०० किमी / तास वेग धारण करत आघाडी घेतली.
रोमांचक रेस
जगाच्या इतिहासातल्या अत्यंत "चित्त"थरारक शर्यतीत चित्त्याची स्पर्धा होती सर्वात फास्ट फॉर्मुला इ कार बरोबर. ही शर्यत द. आफ्रिकेत पार पडली. या शर्यतीचा शेवट नेमका काय झाला असेल हे जाणण्याची उत्सुकता तुम्हाला असेलचं.
कोणी मारली बाजी
चित्ता हा पृथ्वीवरचा सर्वात वेगवान प्राणी आहे. तो फक्त ३ सेकंदात १०० किमी / तास वेग धारण करतो, तर फॉर्मुला इ कारसुद्धा ३ सेकंदात १०० किमी / तास वेग गाठते. सुरुवातीला चित्त्याने आघाडी घेतली पण नंतर मात्र कारने चित्त्याला हरवत बाजी मारली.
पर्यावरण जागरूकता
फॉर्मुला इ ड्राईवर जीन एरीक वर्गने यांनी ही चित्त्याबरोबरची शर्यत जिंकली. ही फॉर्मुला इ कार इलेक्ट्रीक असून २२५ किमी / तास हा कमाल वेग गाठते. प्राण्यांवर हवामान बदलाचा परिणाम होतोय त्यातही प्रामुख्याने चित्त्यावर याचा परिणाम मोठा आहे, त्याबद्दल जागरूकता वाढावी म्हणून ही रेस आयोजित केली होती.