Royal Challengers Bangalore vs Gujarat Giants : वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये बुधवारी गुजरात जाएंट्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये गुजरातच्या महिलांनी बंगळूरूच्या महिलांना धूळ चारली. गुजरातने बंगळूरूवर 11 रन्सने विजय मिळवला आहे. मुख्य म्हणजे स्मृती मंधानाच्या टीमचा हा सलग तिसरा पराभव होता. गुजरातने आरसीबीसमोर 202 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या टीमने जिंकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. 


सोफी डिव्हाईनची अर्धशतकी खेळी व्यर्थ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Gujarat Giants च्या टीमने आरसीबीला 202 रन्सचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती आणि सोफीने चांगली सुरुवात करून दिली. मात्र अवघ्या 18 रन्सवर कर्णधार माघारी परतली. यानंतरही सोफीने एका बाजूने तुफान फलंदाजी सुरुच ठेवली. सोफी डिव्हाईनने 45 बॉल्समध्ये 66 रन्सची खेळी केली. यामध्ये 2 सिक्स आणि 8 फोर्सचा समावेश होता. पण सोफीची विकेट गेल्यानंतर बाकी फलंदाजांना विजय मिळवून देता आला नाही. 


सोफिया-हरलीनचं तुफान


गुजरातची ओपनर सोफिया डंक्लीने आरसीबी विरूद्धच्या सामन्यात तुफान फलंदाजी केली. 28 बॉल्समध्ये तिने 65 रन्सची खेळी केली. सोफीयाला यावेळी भारताच्या हरलीनने साथ दिली. हरलीनच्या 67 रन्सच्या खेळीमध्ये 9 फोर्स आणि एका सिक्सचा समावेश होता. दोघींव्यतिरिक्त गुजरातकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. 


आरसीबीसमोर 202 रन्सचं आव्हान


गुजरातने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करून गुजरात जाएंट्सच्या महिलांनी आरसीबीसमोर 202 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. गुजरातची ओपनर सोफिया डंक्लीने 18 बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी तिने महिला प्रिमीयर लीग स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.