मुंबई : भारतासाठी निराशाजनक बातमी आहे. पैलवान सुमित मलिक (Sumit Malik) डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने त्याच्यावर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सुमितची टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची आशाही मावळली आहे. सुमितची डोपिंग टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये काही प्रतिबंधित  पदार्थ आढळले. त्यामुळे सुमितवर युनायटेड वर्ल्ड रेसलिगंच्यावतीने (United World Wrestling) 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. (wrestler Sumit Malik ban 2 years after fails dope test)

 

सुमितला या निर्णयाला आव्हान देण्यासाठी आठवड्याभराचा वेळ देण्यात आला आहे. सोफियात वर्ल्ड ऑलिम्पिक क्वालीफायरमध्ये डोप टेस्टमध्ये आढळल्याने अस्थायी रुपाने निलंबन करण्यात आलं होतं. त्याच स्पर्धेत तो 125 वजनी गटात टोकियो ऑलिम्पिक पात्र ठरला होता. त्यानंतर 30 जूनला झालेल्या डोपिंग टेस्टमध्ये प्रतिबंधित पदार्थ आढळले.

 

सुमित काय म्हणाला? 

 

माझ्या उजव्या गुडघा दुखत होता. त्यामुळे मी आराम मिळावा, यासाठी मी औषध घेतलं. सुमितला टोक्यो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीआधीच्या राष्ट्रीय शिबिरात गुडघ्याला दुखापत झाली होती. एका अधिकाऱ्याने म्हटलं की, "सुमितचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  यूडब्ल्यूडब्ल्यूएने 3 जूनला सुमितवर 2 वर्षांचा प्रतिबंध लगावला. यावर आव्हान देण्यासाठी सुमितकडे आठवडा आहे. सुमित सुनवाईची मागणी करु शकतो किंवा जे घडलंय ते स्वीकारु शकतो". त्यामुळे आता सुमित पुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.