Vinesh Phogat Julana Vidhan Sabha Seat Result 2024: भारताची माजी कुस्तीपटू विनेश फोगट हिने राजकारणाच्या आखाड्यातही मोठा विजय मिळवलेला आहे. 8 ऑक्टोबर रोजी हरियाणा विधान सभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून यात जुलाना जागेवरून विनेश फोगट निवडणूक लढवत होतील. काँग्रेसच्या तिकिटावर विनेश फोगट यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. कुस्तीपटू विनेश फोगट हिचा या निवडणुकीत विजय झाला असून तिने भाजप उमेदवाराचा मोठ्या मतांनी पराभव केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगट हिला विधानसभेसाठी आमदारकीचे तिकीट दिले होते. मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी सुरु असताना सुरुवातीच्या राउंडमध्ये विनेश पिछाडीवर होती मात्र त्यानंतर तिने मोठ्या मतांची आघाडी घेतली आणि भाजपा उमेदवाराचा पराभव केला. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने ट्विट करून विनेश फोगट निवडणुकीत विजयी झाल्याची बातमी दिली. 


हेही वाचा : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर बनणार 'बापमाणूस', व्हिडीओ शेअर करून फॅन्सना दिली गुडन्यूज


विनेशला किती मतं मिळाली?


निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार जुलाना मतदारसंघाची 15 पैकी 15 फेऱ्यांची मतमोजणी झाली असून यात काँग्रेसची उमेदवार विनेश फोगाटला 64491 मतं मिळाली आहेत. तिच्या मतांची टक्केवारी 46.77 इतकी होती. तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार योगेश कुमार यांना 58728 इतकी मते मिळाली, त्यांच्या मतांची टक्केवारी 42.59 इतकी होती.


काय म्हणाला बजरंग पुनिया? 


हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत विनेशचा विजय झाल्यावर बजरंग पुनिया याने तिचा फोटो शेअर करून लिहिले, 'देशाची मुलगी विनेश फोगट हिचे खूप खूप अभिनंदन. ही लढाई फक्त जुलाना जागेसाठी नाही, फक्त 3-4 विरोधी उमेदवारांच्या विरुद्ध नाही किंवा फक्त एखाद्या पार्टीच्या विरोधात नव्हती तर ही लढाई देशातील सर्वात मजबूत शक्तींच्या विरोधात होती. आणि विनेश यात विजयी ठरली. 


कोणा विरुद्ध होती विनेशची लढत?


जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगट तर भाजपने योगेश कुमार यांना तिकीट दिले होते. तर आम आदमी पार्टीकडून कविता राणी ही निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार विनेशचा जवळपास 5 हजार मतांची लीडने विजय झाला असून दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे योगेश कुमार होते.