मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडतायत. टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. यामधील एक नाव म्हणजे वृद्धीमान सहा. वृद्धीमान सहाचा देखील सध्या टीममध्ये समावेश केला जात नाहीये. यानंतर आता सहाने कोच राहुल द्रविड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.


वृद्धीमान सहाचा मोठा खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वेबसाईटशी बोलताना सहाने दिग्गज खेळाडू आणि कोच राहुल द्रविड यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. सहाच्या म्हणण्यानुसार, कोच राहुल द्रविड यांनी त्याला निवृत्ती घेण्याबाबत सुचवलं होतं.


सहाने सांगितलं की, निवृत्तीचा विचार करण्यामागे राहुल द्रविड यांनी आता त्याचा सिलेक्शनसाठी विचार केला जाणार नसल्याचं कारण सांगितलं. 


नुकतंच वृद्धीमान सहाने रणजी ट्रॉफी स्पर्धेतून त्याचं नाव मागे घेतलं आहे. तसंच सहाला त्याचा टीममध्ये समावेश केला जाणार नसल्याचं सांगितलं गेल्याची चर्चा होती.


द्रविड आणि गांगुलीवर हल्लाबोल


रागाच्या भरात येऊन सहा बोलला की, "टीम मॅनजमेंटने मला असं सांगितलं होतं की आता माझा विचार केला जाणार नाही. मी याविषयी यापूर्वी कधी बोललो नाही कारण मी टीमचा एक भाग होतो. तर गांगुली यांनी मला टीममधील स्थानाविषयी चिंता करू नको असं सांगितलं होतं. मात्र तरीही मला टीममधून वगळण्यात आलं."