कोलकाता : आयपीएलच्या ११व्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज कोलाकाताविरुद्ध हैदराबाद असा सामना रंगणार आहे. सलग चार पराभवानंतर सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या हैदराबादचा विकेटकीपर वृद्धिमन साहाच्या मते शुक्रवारी होणाऱ्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात चित्र बदलण्यासाठी संघाला तीन ते चार चांगल्या ओव्हर मिळण्याची गरज आहे. दोन्ही संघ इडन गार्डनवर आमनेसामने येणार आहेत. या सामन्यातील विजेता संघ रविवारी फायनलमध्ये चेन्नईशी भिडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईने याआधी हैदराबादला हरवत फायनलमध्ये जागा पक्की केली होती. एलिमिनेटर सामन्यात कोलकाताने राजस्थानला २५ धावांनी हरवत क्वालिफायर २मध्ये जागा मिळवली. सामन्याआधी पत्रकारांशी बोलताना साहा म्हणाला, आम्ही भूतकाळ विसरलोय. गेल्या चार सामन्यांतील पराभवाबद्दल आम्ही विचार करत नाहीयोत. आम्हाला माहीत आहे की सामन्यातील तीन ते चार ओव्हर सामन्याचे चित्र बदलू शकतात.


हैदराबाद या सीझनमध्ये प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करणारा पहिला संघ ठरला होता. मात्र गेल्या सामन्यात त्यांना बंगळूरु, कोलकाता, चेन्नईविरुद्ध पराभव पत्करावा लागला. साहा पुढे म्हणाला, कोलकाताने सलग चार सामने जिंकले असले तरी हैदराबादला काही फरक पडत नाही. कारण आमचा संघ कोणत्याही परिस्थितीत खेळण्यास तयार आहे. 


सध्याच्या घडीला कोलकाताचे गोलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यामुळे हैदराबादलाही तितकीच दमदार कामगिरी करावेल. फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ पुरेपूर प्रयत्न करतील.