मुंबई: IPL दरम्यान अनेक खेळाडूंनी एकमेकांच्या खेळण्याच्या स्टाइलची नक्कल केली होती. कधी रविंद्र जडेजा असो किंवा जोस बटलर असो त्यांनी केलेली नक्कल फारच मजेशीर होती. आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं देखील संघातील खेळाडूची नक्कल केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्याची तयारी करत आहे. 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी सीरिज खेळायची आहे. या दौऱ्याआधी विराट कोहली त्याच्या क्वारंटाइन लूकमुळे आणि त्यानंतर हिटमॅनच्या केलेल्या नकलीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 



टीम इंडियाच्या सरावादरम्यान हिटमॅन रोहित शर्मा आपली बॅट घेऊन सरावासाठी मैदानात येत असताना मैदानात खेळणाऱ्या विराट कोहलीनं त्याची नक्कल केली. हिटमॅनच्या फलंदाजीची नक्कल करत त्याच्याकडे पाहू लागला. रोहित शर्माने कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या सरावासाठी निघून गेला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान हा व्हिडीओ केव्हाचा आहे याबाबत कोणती माहिती मिळू शकली नाही. 


विराट कोहलीचा खतरनाक लूक! कोणी म्हणाल 'बॉबी देओल' तर कोणी 'प्रोफेसर'


टीम इंडिया सध्या ICC कसोटी रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. 18-22 जून दरम्यान टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी सीरिज खेळणार आहेत.