नवी दिल्ली - विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम उद्या न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झालीय. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार, यावर क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडलकरने 'झी न्यूज'शी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे. 


कोण जिंकणार WTC अंतिम सामना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या या अंतिम सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे. टेस्ट क्रिकेटचा चॅम्पियन कोण होणार याची उत्सुकता वाढू लागली आहे. यावर बोलताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलंय, साहजिकच माझा पाठिंबा भारतीय टीमला असेल आणि विजयाची संधीही भारतीय टीमलाच आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे भारतीय संघाला सरावाची संधी कमी मिळाली असली तरी टीम समतोल आहे.


पुढचे पाच दिवस क्रिकेट चाहते लक्षात ठेवतील


न्यूझीलंड टीमने नुकतीच इंग्लंडविरुद्ध टेस्ट सीरिज जिंकली आहे. पण गोष्ट आता मागे पडलीय. 18 तारखेपासून पुढचे पाच दिवस महत्त्वाचे ठरणार आहे. कोणती टीम सरस कामगिरी करतेय, हेच क्रिकेटप्रेमींच्या लक्षात रहाणार आहे. या तगडा मुकाबला असणार आहे आणि दोन्ही टीम तितक्याच तुल्यबळ आहेत.